मुकुंद फडके यांचा सोमवारी सत्कार
षष्ठब्दीपूर्तीनिमित्त दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे आयोजन
सातारा
येथील ज्येष्ठ पत्रकार,लेखक, संपादक, प्राध्यापक, वक्ता, चित्रपट अभ्यासक मुकुंद फडके यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती निमित्त त्यांचा विशेष सत्कार दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित करण्यात आला आहे सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे हा सत्कार समारंभ होणार आहे यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, लेखक व पर्यावरण अभ्यासक डॉक्टर संदीप श्रोत्री आणि दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांच्या हस्ते हा सत्कार केला जाणार आहे यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे

