चंद्राच्या साक्षीने मधुर संगीताची निर्मिती


दीपलक्ष्मी सभागृहामध्ये कोजागिरीनिमित्त गाण्यांचा कार्यक्रम

सातारा

चंद्र हे नेहमीच गीतकार दिग्दर्शक आणि संगीतकार यांच्यासाठी आकर्षण ठरले आहे या चंद्राच्या साक्षीनेच हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मधुर संगीताची निर्मिती झाली असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार संगीत अभ्यासक मुकुंद फडके यांनी केले

दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि आम्ही आनंद यात्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने चंद्र आहे साक्षीला ही चंद्र गीतांची सुरेख रजनी दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आली होती तेव्हा ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मोहन सुखटणकर, ऍड अश्विनी झाड,ऍड अमोल चिकणे,प्रा ज्योती जगताप,मुकुंद पांडे शिरीष चिटणीस उपस्थित होते
मुकुंद फडके पुढे म्हणाले, मानवाने चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर काही प्रमाणात गीतकारांची प्रतिभा जरी खुंटली असली तरी विविध कारणाने चंद्र हा चित्रपटसृष्टीचा भाग राहिला कधी तो चंदा मामा म्हणून समोर आला तर कधी तो प्रेयसीचा चेहरा म्हणून समोर आला तर कधी एक सल्लागार म्हणून चंद्राकडे पाहिले गेले आधुनिक काळामध्ये चंद्राचे हे महत्त्व कमी झाले असले तरी जुन्या काळातील संगीतामुळे हे महत्त्व अद्यापही टिकून आहे

Advertisement

दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन शिरिष चिटणीस यांनी या सभागृहात सादर होणाऱ्या संगीताच्या कार्यक्रमांमध्ये किमान चार मराठी गाणी सादर व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच अभिजात मराठी भाषेला एक वर्ष पूर्ण होत असताना मराठी भाषेच्या वाचन संस्कृतीकडे आपल्या पाल्याची आवड विकसीत केली पाहिजे असेही प्रतिपादन केले. ज्या महाराष्ट्रात मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची आणि परिसराची भाषा आहे,त्या भाषेमुळेच विद्यार्थांची प्रगती होणार असल्याने मराठी गीतांच्या तसेच कवितांच्या माध्यमातून त्यांच्यात मराठी भाषेची गोडी निर्माण करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
यावेळी मोहन सुखटणकर, ऍड अश्विनी झाड यांनीही कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. अश्विनी झाड यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला.
यावेळी गायक कलाकार अशितोष वाळिंबे, लक्ष्मीकांत अघोर, प्रशांत कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, मुकुंद पांडे रेश्मा वाळिंबे, प्रिया अघोर,विजया चव्हाण यांनी विविध चंद्रगीते साजरी सादर केली.या कार्यक्रमाची संकल्पना मुकुंद पांडे यांची होती. कार्यक्रमाचे निवेदन स्नेहल कुलकर्णी यांनी केले तर ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे अक्षता शेवडे यांनी पाहिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!