वार्षिक राशिभविष्य 2025 :वृश्चिक


वार्षिक राशिभविष्य 2025

2025 च्या पोटात काय दडले असेल याची उत्सुकता सगळ्यांना असेल पुढील वर्षी शनी महाराज 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील त्यामुळे मकर राशीची साडेसाती संपत असून मेष राशीची साडेसाती सुरू होईल 14 मे 2025 रोजी गुरुचा मिथुन राशीत प्रवेश होईल तसेच 18 मे 2025 रोजी राहू आणि केतू यांचाही राशी बदल होईल राहू मीनेतून कुंभ राशीत प्रवेश करेल तर केतू कन्येतून सिंह राशीत प्रवेश करील वार्षिक भविष्य पाहताना वरील मुख्य ग्रहांचे राशी बदल आणि इतर सर्व ग्रहांचे गोचर पाहून राशिफल तयार होते

Advertisement

वृश्चिक
अडचणी कमी होतील
यावर्षी वृश्चिक राशीचे लोक शनीच्या ढय्यामधून मुक्त होतील त्यामुळे कार्यक्षेत्रात ज्या अडचणी येत होत्या त्या कमी होतील नोकरीत सहकारी सहकार्य करीत नव्हते बॉसशी संबंधही फारसे चांगले नव्हते ते सर्व संबंध यावर्षी सुधारतील ज्या व्यक्तींना कामासाठी कुटुंबापासून दूर राहावे लागत होते त्यांची पुन्हा घर वापसी होईल शेअर मार्केट मधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल कमोडिटी मार्केटमध्ये जर गुंतवणूक केली तर त्यातून चांगला फायदा मिळू शकतो सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान मिळेल राजकारणातील व्यक्तींना नवीन जबाबदारी मिळेल ही जबाबदारी ते लोक व्यवस्थित पार पाडतील विवाह जुळण्यात ज्या अडचणी येत होत्या त्या समतील आणि मनपसंत जोडीदाराशी विवाह होतील स्वतःचे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामात यश मिळेल प्रेम संबंधात यश मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागेल परंतु जर चांगली मेहनत करून अभ्यास केला तर यश नक्की मिळेल यावर्षी सरकारी नोकरी करणारे अधिकारी यांनी लाच घेण्याचा प्रयत्न करू नये नाहीतर पकडले जाऊन जेल यात्रा ही घडू शकते यावर्षी प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल नाहीतर सामान चोरी होण्याची शक्यता आहे जून महिन्यात जास्त सावध राहा योगासने आणि व्यायाम करत रहा चिंता करू नका 29 मार्च 2025 रोजी शनीचे गोचर मीन राशीतून होईल म्हणजेच तुमच्या पंचमस्थानातून गोचर होईल तुमच्या मुलांकडून मानसन्मान मिळेल मुलांना परदेशात नोकरी मिळेल अनेकांना पैसे कमविण्याचे अनेक मार्ग मिळतील 14 मे रोजी गुरुचे गोचर मिथुन राशीतून होईल वृश्चिक राशीच्या अष्टमात गुरुचे भ्रमण होईल त्यामुळे काही अडचणी येऊ शकतात या काळात रागावर नियंत्रण ठेवावे लागेल आपल्या माणसांशी बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवा सरकारी किंवा खाजगी नोकरी करणाऱ्या काही व्यक्तींची नोकरी जाऊ शकते आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींशी शत्रुता घेऊ नका नाहीतर जेल यात्रा सुद्धा करावी लागेल यामध्ये राजकीय लोक पोलीस अधिकारी यांच्याशी पंगा घेऊ नका गुरुचे अष्टमातील भ्रमण हे अध्यात्मिक व्यक्तींसाठी अतिशय उत्तम असेल ज्यांना आजपर्यंत गुरु भेटला नाही त्यांना गुरु भेटू शकतो 18 ऑक्टोबर 2025 रोजी गुरु कर्क राशीत प्रवेश करेल हे भ्रमण पाच डिसेंबर पर्यंत राहील नवमस्थानातील गुरु तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करेल कुटुंबात सुख-समृद्धी येईल 30 मे रोजी राहू आणि केतू चे गोचर कुंभ आणि सिंह राशीतून होणार आहे राहू तुमच्या राशीपासून चतुर्थात तर केतू दशम स्थानातून गोचर करेल सकारात्मक रहा कोणाशीही वैरभाव ठेवू नका आईकडे जास्त लक्ष द्यावे लागेल वृश्चिक राशीसाठी जानेवारी मार्च जुलै आणि नोव्हेंबर हे महिने थोडे आव्हानात्मक राहतील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!