गुरुवारी साताऱ्यात हरसिंगार के पुष्प गाण्यांचा कार्यक्रम
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजन
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये हरसिंगार के पुष्प हा गाण्यांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे या कार्यक्रमाची संकल्पना गायिका ममता नरहरी यांची असून यावेळी त्या स्वतः आणि विजय साबळे विविध प्रकारची गाणी सादर करणार आहेत हरसिंगार याचा अर्थ पारिजातकाची फुले, साहजिकच या कार्यक्रमांमध्ये लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, गीता दत्त, वाणी जयराम,अलिशा चिनाय, मोहम्मद रफी मुकेश शारदा ,दिलजीत कौर, सुरय्या अशा विविध गायक गायिकांची गाणी सादर केली जाणार आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ शास्त्रीय गायक डॉक्टर संजय दीक्षित यांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड सीमंतीनी नूलकर मुकुंद फडके शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे निवेदन दिपाली गीते करणार असून ध्वनी संयोजन सचिन शेवडे व अक्षता शेवडे सांभाळणार आहेत

