कर्नल प्रशांत निकम यांचे निधन
शनिवारी साताऱ्यात अंत्यसंस्कार
Advertisement
सातारा
कर्नल प्रशांत सर्जेराव निकम (वय ६०)यांचे मुंबई येथे अल्प आजाराने आज निधन झाले .त्यांच्या मागे वडील सर्जेराव निकम, बंधू सुनील , पत्नी, कन्या कॅप्टन प्राजक्ता निकम, एक मुलगा असा परिवार आहे .
मूळचे इंदोली (ता.कराड )येथील रहिवासी असणारे प्रशांत निकम यांची 1986 मध्ये लष्करात सेकंड लेफ्टनंट म्हणून निवड झाली होती. पुरी ऑपरेशन, श्रीलंका, सियाचीन, काश्मीर आदी ठिकाणच्या लष्करी मोहिमात त्यांनी आपली सेवा बजावली. दरम्यान ,सातारा येथील कोयना सन्मित्र हौसिंग सोसायटीत (गोळीबार मैदान ) येथील निवासस्थानाहून त्यांची उद्या (दि.७)सकाळी अंत्ययात्रा निघेल. दहाच्या दरम्यान सातारा माहुली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

