सातारची अंकिता आढाव पहिली महिला क्रिकेट पंच
सातारा,
सातारा येथील एम. के.क्रिकेट अकादमीची खेळाडू अंकिता आढाव सातारा जिल्ह्यातील पहिली महिला क्रिकेट पंच ठरली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित क्रिकेट पंच परीक्षा अंकिताने उत्तीर्ण केली आहे.तिच्यासाठी हे अभिमानास्पद यश असून क्रिकेटमधील वाढती स्पर्धा आणि क्रिकेटमध्ये पंचांची महत्वाची भूमिका पाहता तिने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.आता ती महाराष्ट्र क्रिकेट असो.तर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेत अधिकृत पंच म्हणून काम पाहू शकेल.स्थानिक तसेच राज्य स्तरावर होणाऱ्या स्पर्धात पंच म्हणून काम करताना तिला अनुभव मिळेल.त्याचा फायदा तिला भविष्यात होईल.
तिला मयूर कांबळे यांनी मार्गदर्शन केले. एम.सी.ए.चे सचिव कमलेश पिसाळ,जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष निशांत गवळी,सचिव इर्शाद बागवान यांनी तिला शुभेच्छा दिल्या.अंकिता मूळची मरळी ,या.पाटण येथील असून उंब्रज महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.विभागीय पातळीवर ती अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळली आहे.

