मंगळवारी कोजागिरीनिमित्त गाण्यांचा कार्यक्रम


गिर्यारोहक मानसी सदामते यांच्या सत्काराचे आयोजन

सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि माय बिट्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे चंद्र आहे साक्षीला हा कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने खास चंद्रगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ कामिनी पाटील,मुकुंद फडके,सुरेखा शेजवळ,शिरिष चिटणीस, डॉ सुहास पाटील,लियाकत शेख उपस्थित राहणार आहेत

Advertisement

यावेळी नृत्यप्रशिक्षक व गिर्यारोहक मानसी सदामते यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे
या कार्यक्रमात सविता कुंभार,मंजिरी दीक्षित, सीमा राजपूत, चित्रा भिसे,लियाकत शेख,अल्ताफ मुल्ला,आशुतोष देशपांडे, धिरेंद्र राजपुरोहित,गणेश शिंदे,जलील शेख हे गायक कलाकार चंद्रगाणी सादर करणार आहेत कार्यक्रमाची संकल्पना लियाकत शेख यांची असून निवेदन चित्रा भिसे बकरणार आहेत ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे अक्षता शेवडे सांभाळणार आहेत
सर्वांनी या अनोख्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी पतसंस्था चेअरमन शिरीष चिटणीस आणि माय बिट्स स्टुडिओ तर्फे लियाकत शेख यांच्यातर्फे करण्यात आले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!