परशुराम जन्मोत्सवानिमित्त २९ एप्रिल रोजी शोभा यात्रा
साताऱ्यात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजन
सातारा
परशुराम जन्मोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, सातारा जिल्हा यांच्यातर्फे सायंकाळी पाच वाजता भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे.राजवाडा गोलबाग येथून शोभायात्रेला प्रारंभ होणार असून देवी चौक मार्गे शनि मारुती मंदीर येथे सांगता होणार आहे हॉटेल
चंद्रविलासचे वसंतशेठ जोशी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत
शनी मारुती मंदीरामध्ये शोभायात्रेच्या सांगतेच्या वेळी परशुरामांची आरती होईल. चैत्रागौरीचे हळदीकुंकवाचे औचित्य साधून डाळ पन्हे देण्यात येणार आहे.सकाळ ब्राह्मण समाजाने या शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे सुरेश काणे ,मंजिरी काणे,दीपाली कुलकर्णी,ऍड सन्मान अयाचित,सुजित कुलकर्णी,पराग बोडस,वृषाली मेहेंदळे,गणेश मेहेंदळे,निलेश कुमठेकर यांनी केले आहे

