नव्या पिढीपर्यंत संगीत पोहोचवणे आव्हान
दीपलक्ष्मी सभागृहात सदाबहार गाण्यांची मैफल
सातारा
हिंदी चित्रपटसृष्टीने संगीताचे सुवर्णयुग पाहिले. अजूनही काही दशकांपूर्वी निर्माण झालेले संगीत मनापासून ऐकले जाते. पण नवीन पिढीसमोर मात्र हे सदाबहार संगीत पोहोचवणे हे एक आव्हान आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी व्यक्त केले
येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात दिपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि सुहाना सफर सिंगर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सदाबहार हिंदी गाण्यांची मैफल सादर करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर डॉक्टर संदीप श्रोत्री, श्रीराम नानल,विजय साबळे आणि दीपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले उपस्थित होते
मुकुंद फडके पुढे म्हणाले, भारतीय संगीतामध्ये एक जादू आहे .अनेक पिढ्यांनी या जादूचा अनुभव घेतला आहे. पण नवीन पिढीला मात्र या जादूचा अनुभव नाही. नवीन पिढीच्या कानापर्यंत जुने संगीत पोहोचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. सुहाना सफर सिंगर क्लब सारख्या विविध संगीत संस्थांच्या माध्यमातून हे काम होऊ शकेल.
श्रीराम नानल यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये चित्रपट आणि चित्रपट संगीताचा प्रभाव कसा पडला याबाबत काही आठवणी सांगितल्या
डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली
यावेळी गिरीश खुटाळे, चंद्रशेखर बोकील, डॉक्टर सुनील पटवर्धन,डॉक्टर सुहास पाटील, मिलिंद हर्षे, शिवकुमार, धीरेंद्र राजपुरोहित, चंद्रशेखर प्रभुणे, सुषमा बगाडे ,ममता नरहरी, कविता शिवकुमार, सीमा रजपूत, स्वाती खैर, तरनुम सय्यद ,दिपाली घाडगे यांनी सदाबहार गाणी सादर केली
कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना विजय साबळे य
यांची होती
निवेदन दीपाली गीते यांनी केले
ध्वनी व्यवस्था सुभाष कुंभार यांची होती
फोटो ओळ
दीप प्रज्वलन करताना डॉ संदीप श्रोत्री,मुकुंद फडके,श्रीराम नानल,विजय साबळे,विनायक भोसले

