सिंधुदुर्गात भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम


वनशक्ती संस्थेच्या पुढाकाराला अनेकांचा पाठिंबा
मुंबई
सागरी परिसंस्थेचं जतन करण्याच्या हेतूनं वनशक्ती संस्थेच्या वतीनं यशस्वीरीत्या पार पडली. ही मोहीम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ , भारतीय मत्स्य सर्वेक्षण , नीलक्रांती संस्था आणि युथ बीट फॉर एनव्हारमेंट यांच्या सहकार्यानं करण्यात आली. . या कार्यक्रमात स्थानिक स्वयंसेवक, पर्यावरणवादी आणि सागरी तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे समुद्रतळातून अडीचशे किलोपेक्षा अधील जैवविघटनशील नसलेला कचरा बाहेर काढण्यात आला.सागरी परिसंसंस्थेला धोका निर्माण करणाऱ्या प्लास्टिक प्रदूषण आणि इतर कचरा सामग्रीच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यावर या मोहिमेनं लक्ष केंद्रित केलं . स्कुबा डायव्हर्सच्या पथकांनी पाण्याच्या पृष्ठभागाखालील प्लास्टिक, मासेमारीच्या जाळ्या, बाटल्या आणि कालांतरानं जमा झालेले इतर हानिकारक अवशेष गोळा केले. समृद्ध जैवविविधता आणि स्वच्छ किनाऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदूर्गमधील या सागरी परिसंस्थेचे संरक्षण करण्याच्या उपक्रमांमध्ये ही स्वच्छ्ता मोहीम अत्यंत महत्वाची ठरली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!