बुधवारी साताऱ्यात फुलले रे क्षण माझे कार्यक्रम
आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष मैफिल
Advertisement
सातारा
92 वर्षाच्या चीरतरुण चतुरस्त्र पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे फुलले रे क्षण माझे हा आशा भोसले यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाची संकल्पना अश्विनी कांबळे आणि मेघा पंडित यांची असून या दोघीच गाणी सादर करणार आहेत सूत्रसंचालन मेघा पंडित करणार आहेत कार्यक्रमाचे उद्घाटक दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार मुकुंद फडके उपस्थित राहणार आहेत रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे करण्यात आले आहे

