लोकमंगल हायस्कूल येथे पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना शालेय स्तरावरच वाव: सुजाता सोनमळे
सातारा
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले विविध कलागुण शोधून त्यांना शालेय स्तरावरच व्यासपीठ मिळाले पाहिजे. अशा स्पर्धा हीच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची खरी शिदोरी असते,” असे प्रतिपादन माजी विथार्थीनी, उद्योजिका सुजाता सोनमळे यांनी केले. त्या लोकमंगल हायस्कूलमध्ये आयोजित पाककला स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी भूषविले. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “शैक्षणिक प्रगतीबरोबरच अशा सांस्कृतिक, कला आणि कौशल्यवर्धनात्मक स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात. पाककलेसारख्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, आत्मविश्वास आणि कार्यकुशलता वाढते. जीवनातील पुढील वाटचालीसाठी ही गुणवैशिष्ट्ये अत्यंत महत्त्वाची आहेत.
या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या बाबर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “लोकमंगल हायस्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेत असते. पाककला स्पर्धा ही त्यातीलच एक महत्त्वाची कडी आहे.”
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशपर्यंत अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून मांडणी केली. त्यांच्या सर्जनशीलतेने उपस्थित मान्यवर थक्क झाले. आकर्षक सजावट, पौष्टिकता आणि चविष्टपणा यांचा उत्तम संगम विद्यार्थ्यांच्या पदार्थांत दिसून आला. परीक्षकांनी प्रत्येक सादरीकरणाचे बारकाईने परीक्षण करून विजेत्यांची निवड केली.
कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक विजय यादव, उदय जाधव, गुलाब पठाण, संगीता कुंभार, भास्कर जाधव, बाळकृष्ण इंगळे, यश शिलवंत, सतीश पवार,चंद्रकांत देवगड ,विजय गव्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींनी शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाचे नियोजन प्रतिभा वाघमोडे वैशाली वाडीले यांनी केले .

