देशभक्तीची भावना रुजवण्याचे काम गीतांमुळे होते
शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांचे प्रतिपादन
सातारा
प्रत्येकाच्या मनामनामध्ये देशभक्ती रुजवण्याचे काम देशभक्तीपर गाणी करतात. शालेय पातळीपासूनच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी अशी गाणी महत्त्वाची आहेत असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी केले
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे दीपलक्ष्मी सभागृहामध्ये जास्वंद निर्मित आणि सारेगम प्रस्तुत जनगणमन ते वंदे मातरम हा देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या
दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम स्तुत्य असून शाळा शाळांमध्ये अशा प्रकारच्या देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करून लहान वयातच विद्यार्थ्यांना देशभक्तीची जाणीव करून देणे गरजेचे आहे असेही शबनम मुजावर यांनी सांगितले
शिरीष चिटणीस यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यामागील संकल्पना स्पष्ट केली. या सभागृहात आत्तापर्यंत संगीताचे विविध कार्यक्रम करण्यात आले पण देशभक्तीवर आधारित गाणी प्रथमच सादर करण्यात आली याचा आनंद वाटतो असे ते म्हणाले
ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी यावेळी भारतीय चित्रपट सृष्टीतील देशभक्तीपर गाण्यांचा आढावा घेतला आधुनिक काळात विविध रंगांमध्ये जाती धर्म विभागले गेले असल्याने तिरंग्याचा रंग समोर आणण्यासाठी देशभक्तीची भावना रुजवणे आवश्यक आहे असे त्यांनी स्पष्ट केले
यावेळी गायक सौ धनश्री बागडे सुधीर मुळे आणि संतोष वाघ यांनी जनगणमन ते वंदे मातरम या संकल्पनेअंतर्गत विविध देशभक्तीपर गाणी सादर केली जनगणमनने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली
संतोष वाघ यांचे खुसखुशीत आणि अभ्यासपूर्ण निवेदन यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली
यावेळी युनूस शेख उपस्थित होते त्यांनीही या कार्यक्रमाचे कौतुक केले

