अडीच अक्षरी कविता पुस्तकाचे बुधवारी लोकार्पण
प्राध्यापक विश्वास वसेकर यांच्या कवितासंग्रहावर होणार चर्चा
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे कविवर्य प्रा विश्वास वसेकर यांच्या अडीच अक्षरी कविता या कविता संग्रहाचा लोकार्पण सोहळा होणार आहे
यावेळी प्रा विश्वास वसेकर यांच्या साहित्यावर चर्चाही होणार आहे
या काव्यसंग्रहाचे लोकार्पण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे असणार आहेत
ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके, लेखिका व पर्यावरण तज्ञ ऍड सीमंतिनी नुलकर, लेखक सर्जन व पर्यावरण तज्ञ डॉक्टर संदीप श्रोत्री उपस्थित राहणार असून ते वसेकर यांच्या साहित्यावर चर्चा करणार आहेत या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन शिरीष चिटणीस यांनी केले आहे

