नव्वदच्या दशकातही श्रवणीय संगीताची निर्मिती


दीपलक्ष्मी सभागृहात संगीताचा कार्यक्रम संपन्न

सातारा
1950 तो 1970 हा हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीताचा सुवर्णकाळ समजला जातो. पण त्यानंतर नव्वदच्या दशकातही काही नवीन संगीतकारांनी श्रवणीय संगीताची निर्मिती केली असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि संगीताचे अभ्यासक मुकुंद फडके यांनी केले. येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या दीपलक्षी सभागृहामध्ये प्रवीण जांभळे आणि सुजाता दरेकर यांनी स्वरगंध आणि स्वरगंधार या कार्यक्रमांच्या अंतर्गत हिंदी गाण्यांचा धडाकेबाज कार्यक्रम सोमवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी सादर केला तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस हे उपस्थित होते.
मुकुंद फडके म्हणाले, 90 च्या दशकामध्ये गुलशन कुमार यांनी अनेक गुणवान संगीतकार आणि गायक यांना समोर आणले.संगीताची बँक ही संकल्पना राबवत त्या काळात मागणीप्रमाणे संगीताचा पुरवठाही करण्यात आला. या कालावधीमध्ये नदीम श्रवण आनंद मिलिंद आणि ए आर रहमान यांच्यासारख्या अनेक संगीतकारांनी श्रवणीय गाणी निर्माण केली.
जुनी गाणी हा सापेक्ष विषय असून प्रत्येक पिढीप्रमाणे जुनी गाणी कोणती ही संकल्पना बदलत जाते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले

शिरिष चिटणीस म्हणाले,महमद रफी यांच्या लहानपणी त्यांच्या गावात फकीर यायचा आणि गाणे म्हणायचा. ते त्याच्या मागे गावभर फिरायचे आणि ऐकलेली सर्व गाणी पाठ करून रियाज करायचे. तसेच या ठिकाणी होणाऱ्या कराओके कार्यक्रमाची गाणी ऐकत जुनी-नवी पिढी गाण्याकडे आकृष्ट होत गाणी सादर करतील असा आम्हाला विश्वास वाटतो.

Advertisement

यावेळी 1990 नंतर निर्माण झालेल्या हिंदी गाण्यांचा सुजाता दरेकर प्रस्तुत स्वरगंधार आणि प्रवीण जांभळे प्रस्तुत स्वरगंध यांनी सादर केला. कार्यक्रम निवडक पण अत्यन्त दर्दी ,संगीत प्रेमी लोकांच्या उपस्थितीत उत्तमरित्या पार पडला..सुजाता दरेकर यांच्या बॅनर चे नाव आधी स्वरागिनी होते पण आता ते स्वरगंधार असे ओळखले जाते स्वरगंधार चा हा पहिला कार्यक्रम होता..
या कार्यक्रमात अतिशय निवडक अशी 90 सालातील आणि इतर काही उत्तम गाणी प्रवीण जांभळे सआणि सुजाता दरेकर यांनी सादर केली सर्वच गाणी उत्कृष्ठ गायली सुद्धा आणि उत्तम सादरिकारण सुद्धा केले..सर्वच गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला
जांभळे यांचे सुपुत्र ओंकार याने मैने पूछा चांद से हे छान गीत सादर केले सुजाता मॅडम यांनी थोडक्यात पण छान निवेदन केले.
विलास जावळे-विजय आवळे आणि इतर सर्वांनी दोन्ही गायकांचे कौतुक केले.उत्तम गायन,उत्तम सादरीकरण,गायनाचा उत्तम स्टॅमिना आणि नेहामीच उत्तम निवडक गाणी या शब्दात सर्वांनी कौतुक केले.अन्नपूर्णा हॉटेलच्या सौ अपर्णा मॅडम यांनीही कार्यक्रमाचे कौतुक केले..
15 ऑगस्टला मानवंदना म्हणून अंगावर अक्षरशः शहारे आणणारे जयोस्तुते हे गीत शेवटी खूप जोशात सादर केले.सर्वांनीच उठून टाळ्या वाजवल्या.भारत माता की जय,वंदे मातरम आशा घोषणांनी हॉल दुमदुमून गेला..
टाळ्यांच्या गजरात या कार्यक्रमाची सांगता झाली..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!