काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत


राज्यातील सर्व 288 जागांसाठी होणार मुलाखती

मुंबई

Advertisement

काँग्रेसचे नेते अभिजित वंजारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची बोलणी सुरु असतानाच काँग्रेस नेत्याने केलेल्या या विधानामुळे नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 288 विधानसभा मतदारसंघात आजपासून काँग्रेसच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. महाविकास आघाडीत जागावाटपाच्या वाटाघाटी सुरु आहेत. पण काँग्रेसचा 288 मतदारसंघांसाठीचा प्लॅन तयार आहे, असा दावा काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी केला आहे.
आजपासून वेगवेगळ्या मतदारसंघात आमचे काँग्रेसचे नेते जाणार आहेत. मुलाखती घेणार आहेत. 288 मतदारसंघांचा अहवाल वरिष्ठांना देणार आहोत. 288 मतदारसंघात आमचे उमेदवार तयार आहेत.असं वंजारी यांनी सांगितलं आहे.
निवडणुकीच्या आधी स्थानिक पातळीवर चर्चा झाली पाहिजे. स्थानिक लोक, उमेदवार यांचं म्हणणं ऐकायचं आहे. मविआ एकत्र आहे. शिवसेनेला किंवा राष्ट्रवादीला एखादी जागा नकोय. तर आमचा प्लॅन बी तयार पाहिजे. निकष स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी यांचं काय म्हणणं आहे. सर्व उमेदवारांना समोर बसवून त्यांचं म्हणणं जाणून घेणं महत्वाचं आहे. जागांची अदलाबदली झाली आहे. वर्ध्यामध्येही झाली आहे. त्यामुळे आमची तयारी असणं आवश्यक आहे, असं अभिजीत वंजारी म्हणाले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!