सोमवारी मराठी हिंदी गीतांचा धडाकेबाज कार्यक्रम
प्रवीण जांभळे प्रस्तुत स्वरगंध आणि सुजाता दरेकर प्रस्तुत स्वरगंधार
Advertisement
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी संस्कृती हॉलमध्ये मेरी आवाजही पहचान है हा मराठी हिंदी गीतांचा धडाकेबाज कार्यक्रम सादर केला जाणार आहे
प्रवीण जांभळे प्रस्तुत स्वरगंध आणि सुजाता दरेकर प्रस्तुत स्वरगंधार अंतर्गत हा कार्यक्रम सादर होणार आहे
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गुलाब सावंत,काका पाटील,ऍड सीमंतिनी नुलकर,मुकुंद फडके, शिरिष चिटणीस उपस्थित राहणार आहेत
सर्व सातारकर रसिकांनी या गाण्यांच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस यांनी केले आहे

