मराठी संगीतातील वैविध्य वैशिष्ट्यपूर्ण


सदाबहार हिंदी,मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात मुकुंद फडके यांचे प्रतिपादन
सातारा
भारतातील विविध राज्यांमध्ये प्रादेशिक संगीत लोकप्रिय असले तरी मराठी संगीतात आढळणारे वैविध्य वैशिष्ट्यपूर्ण आहे अशी विविधता इतर कोणत्याही राज्यात किंवा देशात सापडत नाही असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी केले
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि सुरसंगीत ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे मराठी हिंदी गीतांचा सदाबहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तेव्हाप्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाला इतर प्रमुख पाहुणे म्हणून विजय साबळे, लक्ष्मीकांत अघोर,शिरीष चिटणीस लेखक आनंद ननावरे उपस्थित होते

Advertisement

मराठी चित्रपट संगीतालाच नव्हे तर मराठी संगीतालाच मोठी परंपरा लाभली आहे दुर्दैवाने गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये मराठी संगीताच्या गुणवत्तेला ओहोटी लागली असली तरी आगामी कालावधीमध्ये पुन्हा एकदा मराठी संगीत सुवर्णकाळ पाहील अशी आशाही मुकुंद फडके यांनी यावेळी व्यक्त केली समाजात होणाऱ्या विविध समारंभामध्ये इतर देशातील किंवा इतर राज्यातील गाणी वाजवली जातात त्याऐवजी तेथे जर मराठी गाण्यांचा वापर करण्यात आला तर मराठी संगीत अधिक लोकांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विशेषतः मराठी लग्नामध्ये तथाकथित संगीत समारंभामध्ये मराठी गाणी न वाचता पंजाबी ठेक्यांची गाणी वाजवली जातात तेव्हा दुःख होते असेही ते म्हणाले
यावेळी कार्यक्रमाचे निर्माता, आयोजक व गायक किशोर शिंदे यांनी आपल्या ग्रुपची माहिती देताना सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून आपण हे कार्यक्रम करत असल्याचे सांगितले दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन शिरीष चिटणीस यांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले

यावेळी कार्यक्रमाचे निर्माता, आयोजक व गायक किशोर शिंदे, सहनिर्माता व गायक उमेश भोसले,पुणे येथील स्मिता गायकवाड, सुवर्णा माने, वैष्णवी आल्हाट आणि सातारचे सागर जावळीकर सुशांत तुपे, सुधा पटवर्धन, अश्विनी कांबळे ,रागिणी शिकलगार, अलिषा शिकलगार या कलाकारांनी गाणी सादर केली आणि रसिकांची वाहवा मिळवली
या कार्यक्रमाचे निवेदन पुणे येथील विनय वैद्य यांनी खुमासदार शैलीत केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!