प्राचार्य वि. ना. लांडगे शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित


सातारा
शिक्षण क्षेत्रात गेली पन्नास वर्षे कार्यरत असलेले प्राचार्य वि ना लांडगे यांचा शिक्षणरत्न हा शिक्षण क्षेत्रातील सन्माननीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. दैवज्ञ सांस्कृतिक भवन येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन प्राचार्य वि ना लांडगे याना सन्मानित करण्यात आले
ओगलेवाडी येथील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेतर्फे हा राज्यस्तरीय सह्याद्री गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवर व्यक्तींना गौरवण्यात आले. त्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील कामाबद्दल प्राचार्य वि ना लांडगे यांचा सन्मान करण्यात आला
तसेच पद्मभूषण क्रांतिवीर स्वर्गीय डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या कार्याची धुरा सांभारणारे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील फडतरे यांच्या या संस्थेने व सर्व पदाधिकारी यांनी विविध क्षेत्रातील निवड केलेल्या इतर मान्यवरांचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
प्राचार्य वि ना लांडगे हे महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे राज्याचे अध्यक्ष असून सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे उपाध्यक्ष, राज्य अभ्यास मंडळाचे माजी सदस्य आहेत पुणे येथे यशदा या शासनाच्या संस्थेत काही वर्ष मराठी विषयाचे मार्गदर्शक म्हणून काम केले आहे
वि ना लांडगे यांना मिळालेला पुरस्काराबद्दल खंडाळा विभाग शिक्षण समितीचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष पवार, संचालक पंडित व संस्थेचे स पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. तसेच सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष यशवंत पाटणे, दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस व इतर सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!