प्रा. रणधिरसिंह मोहिते यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी
यशोदा इन्स्टिट्यूटचा शैक्षणिक आणि संशोधनात्मक कार्यविस्तार वृद्धिंगत करण्यावर भर: अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे
सातारा
यशोदा इन्स्टिट्यूट्सचे सहसंचालक डॉ. रणधिरसिंह दत्तात्रय मोहिते यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मधून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आली असून, त्यांच्या या उज्ज्वल शैक्षणिक यशाबद्दल संस्थेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उल्लेखनीय यशानिमित्त यशोदा इन्स्टिट्यूट्समध्ये विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, विश्वस्त आर्कि. स्वराली सगरे, कुलसचिव गणेश सुरवसे, प्राचार्य तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य यांच्या हस्ते डॉ. मोहिते यांचा सन्मान करण्यात आला
“डेव्हलपमेंट ऑफ रुरल ऍग्रो बेसड अत्रप्रीनियरशिप इकोसिस्टम इन साऊथ वेस्ट महाराष्ट्र” या महत्त्वपूर्ण आणि समकालीन विषयावर त्यांनी केलेल्या संशोधनातून ग्रामीण भागातील विकास, उद्योग निर्मितीची गरज आणि उद्योजकतेच्या शाश्वत पद्धती यांवर मौलिक अभ्यासमूल्य निर्माण झाले आहे. त्यांच्या संशोधनाचे मार्गदर्शन डॉ. सारंग शंकर भोला यांनी केले असून, त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधक मार्गदर्शनातून या अभ्यासाची गुणवत्ता अधिक समृद्ध झाली आहे.
यशोदा इन्स्टिट्यूट्सच्या प्रगतीपथावर हे आणखी एक मोलाचे पाऊल ठरले असून, संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची प्रतिष्ठा वाढवणारे यश म्हणून या उपलब्धीची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संस्थेच्या विद्यार्थी व शैक्षणिक समुदायासाठी डॉ. मोहिते प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून समोर आले आहेत. त्यांचे सेवेचा संपूर्ण काळ हा यशोदा इन्स्टिट्यूट मधील विविध विभागात व्यतीत झाला आहे, त्यांनी आजवर विभागप्रमुख- व्यवस्थापनशास्त्र, अंतर्गत गुणवत्ता हमी समन्वयक, परीक्षा नियंत्रक, प्रशिक्षण व रोजगार विभागप्रमुख, कुलसचिव, सहसंचालक अशा विविध अंगी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
संस्थेच्या विविध महाविद्यालयांमधील प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. समारंभात बोलताना मान्यवरांनी डॉ. मोहिते आणि ग्रामीण उद्योजकतेच्या संधी, नवीन संशोधनाची गरज आणि शिक्षणक्षेत्राच्या सामाजिक उत्तरदायित्वावर भर दिला.
संस्थेचे अध्यक्ष आपल्या मनोगतात म्हणाले की, डॉ. रणधिरसिंह मोहिते यांनी केलेले संशोधन हे ग्रामीण विकास आणि उद्योजकता क्षेत्रातील धोरणनिर्मितीसाठी मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या सारख्या अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेल्या व्यापकांमुळे संस्थेची शैक्षणिक परंपरा अधिक बळकट होते.” उपाध्यक्ष आणि विश्वस्तांनीही डॉ. मोहिते यांचे कौतुक करताना संस्थेच्या सर्वांगिण विकासात त्यांच्या योगदानाचा गौरव केला.
डॉ. मोहिते यांनी आपल्या संशोधन प्रवासाची माहिती सांगितली. त्यांनी ग्रामीण भागातील संसाधनांची समृद्धी, परंतु योग्य दिशा आणि मार्गदर्शनाअभावी उद्योजकतेला मिळणारी मर्यादा, तसेच शासन–खाजगी क्षेत्र–शैक्षणिक संस्था यांच्या प्रभावी समन्वयाची आवश्यकता यावर प्रकाश टाकला. आपल्या मार्गदर्शक डॉ. सारंग शंकर भोला यांचे विशेष आभार मानताना त्यांनी संशोधनात सातत्य, प्रामाणिकता व सामाजिक दायित्व जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
फोटो:
डॉ. रणधिरसिंह मोहिते यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, विश्वस्त आर्कि. स्वराली सगरे, तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य

