आम्ही आनंदयात्रीतर्फे रविवारी हम है राही प्यार के कार्यक्रम
देव आनंद यांच्या चित्रपटातील गाणी होणार सादर
सातारा
येथील आम्ही आनंदयात्री या ग्रुपतर्फे हम है राही प्यार के या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथे होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांच्या चित्रपटातील गाणी सादर केली जाणार आहेत. हा या कार्यक्रमाचा पहिला भाग आहे.
या कार्यक्रमाची निर्मिती आणि दिग्दर्शन मुकुंद पांडे यांचे असून प्रायोजक अनुराधा पांडे आहेत. या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान अनिल वाळिंबे आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अनिल वाळिंबे, शिरीष चिटणीस, डॉक्टर जयंत सरवटे, डॉक्टर सुहास पाटील, मुकुंद फडके उपस्थित राहणार आहेत
यावेळी मुकुंद पांडे, प्रशांत कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, लक्ष्मीकांत अघोर, प्रिया अघोर, आशुतोष वाळिंबे,आशुतोष देशपांडे, मधु गिजरे, विजया चव्हाण, रेश्मा वाळिंबे, के गौरी हे कलाकार गाणी सादर करणार आहेत
या कार्यक्रमाची ध्वनीव्यवस्था सचिन शेवडे आणि अक्षता शेवडे पाहणार असून निवेदन ऍड स्नेहल कुलकर्णी करणार आहेत सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन आम्ही आनंदयात्रीतर्फे मुकुंद पांडे यांनी केले आहे

