दिलीपकुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीत कार्यक्रम


रविवारी दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात आयोजन

सातारा

येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि सूर संगम सदाबहार नगमे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 13 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर कामिनी पाटील, मुकुंद फडके हेमंत कासार, रवींद्र खांडेकर, आणि इकबाल भाई उपस्थित राहणार आहेत

Advertisement

सुरसंगम सदाबहार नगमे संस्थेचे विविध कलाकार यावेळी दिलीपकुमार यांच्यावर चित्रीत झालेली गाणी सादर करणार आहेत

या कार्यक्रमाचा लाभ संगीत रसिकांनी घ्यावा असे आवाहन शिरीष चिटणीस, शहाबुद्दीन भाई शेख आणि युनुसभाई शेख यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!