कल्पना देशपांडे यांच्या पुस्तकाचे रविवारी लोकार्पण
‘त्या दरवाजाआड’ कथासंग्रहावर मान्यवर करणार चर्चा
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे कल्पना देशपांडे यांनी लिहिलेल्या त्या दरवाजाआड या कथासंग्रहाचा लोकार्पण सोहळा व चर्चासत्र रविवार दिनांक पाच एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे
Advertisement
लोकार्पण सोहळ्याला आणि चर्चासत्रासाठी प्रमुख वक्ते म्हणून लेखक व 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, लेखिका ऍड सीमंतिनी नुलकर, लेखक व पर्यावरण तज्ञ डॉक्टर संदीप श्रोत्री व ज्येष्ठ पत्रकार,लेखक व चित्रपट अभ्यासक मुकुंद फडके उपस्थित राहणार आहेत
सर्वानी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन शिरीष चिटणीस यांनी केले आहे

