मधुसूर सुगम संगीत स्पर्धा १७ ऑगस्ट रोजी


नानासाहेब द्रविड यांचे स्मरणार्थ उपक्रम
सातारा
सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे समाजभूषण स्वर्गीय काशिनाथ गणेश उर्फ नानासाहेब द्रविड यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू ऍड अमित द्रविड यांनी राज्यस्तरीय मधुसूर आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धा २०२५ आयोजित केली आहे युवा पिढीला भारतीय संगीत क्षेत्रात नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे सर्व शाळांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन ऍड अमित द्रविड यांनी केले आहे रविवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता शाहू कला मंदिर येथे ही स्पर्धा होणार असून त्यामध्ये बाल गट आणि कुमार गट असे दोन गट ठेवण्यात आले आहेत बालगटामध्ये इयत्ता तिसरी ते सातवीतील विद्यार्थ्यांना भाग घेता येईल तर कुमार गटामध्ये आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल या स्पर्धेतील प्रत्येक गटासाठी प्रथम तीन बक्षिसे आणि उत्तेजनार्थ तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत या स्पर्धेसाठी मर्यादित प्रवेश असून ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचा आहे स्पर्धेसाठी नाममात्र शंभर रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे प्रत्येक स्पर्धकाने प्रवेश फार्मवर आपली चार गाणी नमूद करायची असून त्यामध्ये भावगीत भक्तीगीत अभंग आणि नाट्य गीत यांचा समावेश करता येईल मात्र चित्रपट गीताचा समावेश करता येणार नाही गाणे गाण्यासाठी तीन ते पाच मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी द्रविड ऑफिस 596 गुरुवार पेठ कमानी हौदाजवळ सातारा येथे संपर्क साधावा या स्पर्धेत भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक ५ ऑगस्ट आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!