इंजिनीअरिंग प्रवेशासाठी यशोदा कॅंपस अधिकृत केंद्र
नोंदणीस प्रारंभ,अभियांत्रिकी प्रवेशाच वेळापत्रक जाहीर
सातारा
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य तर्फे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी पदवी (B.E./B.Tech) अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (CAP) नोंदणीस प्रारंभ झाला आहे. यशोदा टेक्निकल कॅंपस, सातारा हे अधिकृत स्क्रूटिनी व सहाय्यक प्रवेश केंद्र म्हणून नियुक्त करण्यात आले असून संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. CAP नोंदणीसाठी अंतिम दिनांक ८ जुलै २०२५ आहे.
अभ्यासक्रम निवडताना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, प्रात्यक्षिकाधिष्ठित शिक्षणपद्धती, आणि उत्कृष्ट प्लेसमेंट यंत्रणा हे घटक महत्वाचे असतात. यशोदा टेक्निकल कॅंपस यामध्ये अग्रेसर आहे. संस्थेमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा, अत्याधुनिक संगणक लॅब, समृद्ध ग्रंथालय, वायफाय-संपन्न कॅंपस, वसतिगृह, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांसाठी आवश्यक सुविधा आहेत.
गेल्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी विविध आधुनिक शाखा उपलब्ध असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, आणि रोबोटिक्स यासारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या संधी उघडल्या आहेत. तसेच, इंडस्ट्री-एकॅडेमिया इंटरफेस, स्टार्टअप व संशोधन प्रकल्पांना प्रोत्साहन देणारे वातावरण येथे आहे.
संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, यांनी सांगितले की “विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी आमचे संपूर्ण मार्गदर्शन, उत्तम अध्यापन व वेळोवेळी कौशल्यविकास उपक्रम राबवले जातात. यशोदा ही केवळ संस्था नसून विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करणारे केंद्र आहे.” विद्यार्थ्यांनी वेळेत कागदपत्रांसह स्क्रूटिनी सेंटरला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा.

“नवीन तंत्रज्ञानाच्या युगात गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. यशोदा टेक्निकल कॅंपसमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना केवळ पदवी नाही, तर त्यांचे कौशल्य, विचारशक्ती आणि नेतृत्व विकसित करण्यावर भर देतो. इंडस्ट्री कनेक्ट, प्रकल्प आधारित शिक्षण, आणि वेळोवेळी घेतले जाणारे टेक्निकल वर्कशॉप्स, हे आमच्या संस्थेचे विशेष वैशिष्ट्य आहे. आम्ही विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानसज्ज जगासाठी तयार करत आहोत.”अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अजिंक्य सगरे यांनी दिली

