यशोदा इन्स्टिट्यूट्समध्ये एमबीए प्रवेश नोंदणीस सुरुवात
८ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन
सातारा
साताऱ्यातील व्यावसायिक शिक्षणातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था यशोदा टेक्निकल कॅम्पस येथील एमबीए अभ्यासक्रमासाठी केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणीस औपचारिक सुरुवात झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ८ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. यशोदा टेक्निकल हे अधिकृत रित्या शासनमान्य सुविधा केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहे.
सुदृढ औद्योगिक संपर्क, अनुभवी प्राध्यापक, अद्ययावत सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती ही यशोदा इन्स्टिट्यूट्सच्या एमबीए विभागाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, सॉफ्ट स्किल्स आणि उद्योजकतेचे प्रशिक्षण येथे दिले जाते.यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या एमबीए विभागात अनुभवी व विषयतज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते. त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतलेला असून उद्योगजगतातील परिस्थितीची जाण विद्यार्थ्यांना करून दिली जाते. इंटरॅक्टिव्ह टीचिंग पद्धती, केसमेथड्स, लाईव्ह प्रोजेक्ट्स, आणि इंडस्ट्री व्हिजिट्स यांचा प्रभावी समावेश शिक्षणामध्ये करण्यात आला आहे.
यशोदा इन्स्टिट्यूट्सचा हायटेक वायफाय कॅम्पस, डिजिटल लायब्ररी, डिजिटल क्लासरूम, मॉडर्न कॉन्फरन्स हॉल, हॉस्टेल, ट्रान्सपोर्ट सेवा आणि सुंदर नैसर्गिक परिसर हे या संस्थेची ओळख बनले आहे.
एमबीए विभागाच्या प्लेसमेंट सेलमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांना विविध मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची संधी मिळते. विविध राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. संस्थेने वेळोवेळी गेस्ट लेक्चर्स, सेमिनार्स, वर्कशॉप्स आयोजित करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला आहे.
व्यवसाय शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्यासाठी नसून नेतृत्व निर्माण करण्यासाठी असते,” असे प्रतिपादन यशोदा इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे सर यांनी केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, मूल्याधारित शिक्षण आणि व्यावसायिक प्रगल्भता घडवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असून, यासाठी अत्याधुनिक कॅम्पस सुविधा व तज्ज्ञ प्राध्यापकांची कुशल टीम हे आमचे खरे बळ असल्याचे त्यांनी सांगितले. गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे संस्थेच्या प्लेसमेंटमध्ये सातत्याने उल्लेखनीय यश मिळत आहे. यशोदा इन्स्टिट्यूट्सचा एमबीए अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना उज्ज्वल आणि यशस्वी करिअरसाठी ठोस दिशा देणारा ठरतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

