श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण सोहळा
समर्थ सदन येथे 3 जुलै ते पाच जुलै दरम्यानआयोजन
सातारा
श्री दत्तप्रभूंच्या कृपाआशीर्वादाने श्रीपाद श्रीवल्लभ भक्त परिवारातर्फे तीन दिवसीय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन तसेच प्रसादिक पादुका पूजन दर्शन, अनघा लक्ष्मी व्रत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार दिनांक 3 जुलै ते शनिवार दिनांक 5 जुलै या कालावधीमध्ये सकाळी नऊ ते चार या कालावधीमध्ये समर्थ सदन येथे हा सोहळा होणार आहे पारायणासाठी नाव नोंदणी करण्यासाठी आणि अन्नदानासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा
सौ मनीषा अनगळ 94 22 00 95 55
शुभांगी ताई 95 53 98 33 59
नीलिमा कुलकर्णी 90 11 14 57 36
पारायण करणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे
ज्या भक्तांकडे चरित्र ग्रंथ नसल्यास तो अल्प दरात(रु. १७०/- )उपलब्ध करून दिला जाईल.
या सोहळ्याचा कार्यक्रम असा आहे
दिवस पहिला
सकाळी ठीक 7.30 वाजता महाराजांच्या पादुकाची स्वागत फेरी त्यानंतर 8.30 ला संकल्प सोडून ठिक 9 वाजता चरित्र पठण सुरु होईल.संकल्पासाठी सर्वांनी घरून येताना ताह्मण पंचपली फुलपात्र घेऊन येणे,१ नारळ आणि फुले , अक्षता,हळदी कुंकू, इ. तसेच अनघालक्ष्मी पूजेसाठी दिलेल्या यादी प्रमाणे सर्व साहित्य घेऊन येणे. सकाळी 10.30 सुमारास चहा-कॉफी तसेच अल्पोपहार साठी विश्राम. दुपारी 1 वा.महाप्रसाद साठी विश्राम दुपारी 2 वाजेपासून अनघालक्ष्मी व्रत पूजा 4 वाजेपर्यंत संपन्न होईल. त्यानंतर दत्त याग होणार आहे.5 वा. च्या सुमारास आरती प्रथम दिन समाप्ती.
दिवस दुसरा
सकाळी 8.30 वाजता श्रीपाद श्रीवल्लभ महाराज पादुकांचे पूजन, पारायण, नामस्मरण.
ठिक 9 वाजता चरित्र पठण सुरु होईल.
सकाळी 10.30 सुमारास चहा-कॉफी तसेच अल्पोपहार साठी विश्राम.
दुपारी 1 वा.महाप्रसादसाठी विश्राम.
दुपारी 1 ते 5 दरम्यान अध्याय वाचन सेवा पूर्ण होईल.
संध्याकाळी 5 वा. आरती द्वितीय दिन समाप्ती .
तिसरा दिवस
सकाळी 8 वाजता श्रीपाद श्रीवल्लभ महाराज पादुकांचे पूजन, ठिक 8.30 वा.नामस्मरण करून पारायणाला सुरुवात.
सकाळी 10.30 सुमारास चहा-कॉफी तसेच अल्पोपहार साठी विश्राम.
दुपारी 1 वा.महाप्रसादसाठी विश्राम.
दुपारी 1 ते 5 दरम्यान अध्याय वाचन सेवा पूर्ण होईल.
संध्याकाळी 5 वा.निरुपण,आरती करून पारायणाची सांगता होईल.

