मराठी संगीतातील वैविध्य अनमोल:मुकुंद फडके


गाणी मराठी मनातील कार्यक्रमाला प्रतिसाद

सातारा
मराठी संगीतात आढळणारे वैविध्य अनुपम आणि अनमोल असून इतर कोणत्याही भाषांमध्ये संगीतामध्ये एवढी विविधता आढळत नाही असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी केले
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि सुहाना सफर ग्रुप यांच्यातर्फे गाणी मराठी मनातील या कार्यक्रमाचा दुसरा भाग दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे सादर झाला तेव्हा ते बोलत होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्याम बडवे,विजय साबळे शिरीष चिटणीस उपस्थित होते
मुकुंद फडके पुढे म्हणाले, गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात मराठी चित्रपट संगीताच्या निमित्ताने जे संगीत निर्माण झाले आहे ते आजही मराठी मनाला भावत आहे.मराठी संगीतामध्ये नाट्यगीते, भावगीते, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, बालगीते, देशभक्तीपर गीते,भक्तोगीते असे विविध प्रकार आढळतात जे इतर कोणत्याही भाषेमध्ये अभावानेच आढळतात
सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी निर्माण झालेले संगीत आजही ऐकले जाते.पण दुर्दैवाने मराठी संगीताची ही परंपरा आधुनिक काळात जपली जात नाही रसिकांच्या दीर्घकाळ लक्षात राहतील अशी संगीत निर्मिती आधुनिक काळात केली जात नाही अशी खंतही यावेळी मुकुंद फडके यांनी व्यक्त केली
यावेळी सुहाना सफर ग्रुपच्या डॉक्टर सुनील पटवर्धन,शिरीष खुटाळे, रामदास जोशी, चंद्रशेखर बोकील, धीरेंद्र राजपुरोहित, राजेंद्र देशमाने, गणेश शिंदे, वनिता कुंभार ,सीमा रजपूत, ममता नरहरी, कविता शिवकुमार, स्मिता शेरकर, दिपाली घाडगे ,कला चंद, स्वाती मोरे आणि विजय साबळे या कलाकारांनी आकाशी झेप घे रे पाखरा, आयुष्यावर बोलू काही, नाविका रे वारा वाहि रे, लाजून हासणे अन ,या चिमण्यांनो परत फिरा, तुझे गीत गाण्यासाठी, मानसीचा चित्रकार तो, चंद्र आहे साक्षीला, नभ उतरू आलं, शारद सुंदर चंदेरी राती, सखी मंद झाल्या तारका , राजा ललकारी अशी हो,सुख म्हणजे नक्की काय असतं ,मेहंदीच्या पानावर, संधी काली या अशा, निसर्ग राजा ऐक सांगतो, अखेरचे येतील माझ्या, हे चिंचेचे झाड, बुगडी माझी सांडली ग, ही चाल तुरुतुरु ही विविध गाणी सादर केली
उपस्थित संगीत रसिकांनी या सादरीकरणाचे टाळ्या वाजवून स्वागत केले
कार्यक्रमाची कल्पना आणि संयोजन विजय साबळे यांचे होते कार्यक्रमाचे निवेदन दिपाली गीते यांनी केले तर धनी व्यवस्था सचिन व अक्षता शेवडे यांनी पाहिली भर पावसातही संगीत रसिकांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला

Advertisement

फोटो
दीप प्रज्वलन करताना महिला गायक कलाकार,शेजारी डॉ श्याम बडवे ,मुकुंद फडके, शिरीष चिटणीस, विजय साबळे, डॉक्टर सुहास पाटील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!