प्रज्वल रेवन्ना भारतात दाखल


विशेष तपास पथकाने विमानतळावरच केली अटक
बंगळुरू
कर्नाटक जेडीएस नेते आणि सेक्स कँडलमधील आरोपी प्रज्वल रेवन्ना अखेर भारतात परतला. निलंबित खासदार प्रज्वल रेवन्ना 35 दिवसानंतर बंगळूरमध्ये दाखल झाला. त्याला विशेष तपास पथकाने (एसआयटी) विमानतळावरच अटक केली होती.प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कॅडल प्रकरण उघड झाल्यानंतर 27 एप्रिल रोजी जर्मनीत पळून गेला होता. दरम्यान, प्रज्वल याला अटक केल्यानंतर विशेष पथकाने त्याला सीआयडी कार्यालयात नेले.
प्रज्वल रेवन्ना याला शुक्रवारी वैद्यकीय चाचणीसाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात येणार आहे. तसेच त्याला २४ तासांच्या आत न्यायालयात हजर करावे लागणार आहे. न्यायालयात एसआयटीकडून त्याची कोठडी मागण्यात येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, एसआयटी प्रज्वल रेवन्नाची 14 दिवसांच्या कोठडीची मागणी करू शकते.प्रज्वलवर आतापर्यंत लैंगिक छळाचे तीन गुन्हे दाखल आहेत. या आठवड्यात त्याने एक व्हिडिओ संदेश जारी केला होता, ज्यामध्ये त्यांनी 31 मे रोजी एसआयटीसमोर हजर राहण्याचे आणि तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.
कर्नाटकात लैंगिक शोषणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रज्वल रेवन्ना एप्रिलमध्ये देश सोडून पळून गेला होता. त्यानंतर एसआयटीच्या विनंतीवरून इंटरपोलने रेवन्नाविरोधात ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस जारी केली होती.
28 एप्रिल रोजी रेवन्ना याच्या घरात काम करणाऱ्या महिलेने तक्रार दिली होती. त्या महिलेने एच.डी. रेवन्ना आणि त्याचा मुलगा प्रज्वल रेवन्ना यांच्यावर यौन शोषणाचा आरोप केला होता. ज्या महिलेने आरोप केला होती ती एच.डी. रेवन्ना याची पत्नी भवानी यांची नातेवाईक आहे. तिला 2019 मध्ये रेवन्नाचा मुलगा सूरज याच्या लग्नात काम करण्यासाठी बोलवण्यात आले होते.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!