यशोदा टेक्निकल कॅंपसमध्ये बीबीए,बीसीए सीईटी साठी नोंदणी सुरू


दुसऱ्या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थी आणि पालकांची प्रतिक्षा संपली
सातारा
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमांसाठी दुसऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचे (सीईटी) आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा अशा विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे, ज्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही.
दुसऱ्या सीईटीसाठी नोंदणी प्रक्रिया १२ जून ते २० जून २०२५ दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकर अर्ज करून तयारी सुरू करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या समान संधी मिळाव्यात, यासाठी यशोदा टेक्निकल कॅंपस, सातारा यांच्याद्वारे विशेष प्रवेश मार्गदर्शन व सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात विद्यार्थ्यांना सीईटीविषयी सविस्तर माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची माहिती, अभ्यासाचे नियोजन व शंका निवारण या सर्व सेवा विनामूल्य दिल्या जात आहेत.
बीबीए आणि बीसीए हे अभ्यासक्रम उद्योग, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन व उद्योजकता क्षेत्रात उज्वल करिअरच्या संधी देणारे आहेत. सीईटीचा अभ्यासक्रम, परीक्षेचा पॅटर्न, पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेवर आधारित मार्गदर्शन तज्ज्ञ प्राध्यापकांकडून दिले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्ट, प्रश्नसंच, अभ्यास टिप्स आणि वैयक्तिक मार्गदर्शनाची सुविधा देखील उपलब्ध आहे.
या प्रवेश कक्षामध्ये विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचीही सखोल समज निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी अधिक प्रभावीपणे प्रवेश परीक्षेला सामोरे जाऊ शकतात.
यशोदा टेक्निकल कॅंपस ही साताऱ्यातील अग्रगण्य संस्था असून, बीबीए व बीसीए अभ्यासक्रमांमध्ये उच्च गुणवत्ता, आधुनिक डिजिटल सुविधा, अनुभवी प्राध्यापकवर्ग आणि शंभर टक्के प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड ही या संस्थेची वैशिष्ट्ये आहेत. संस्थेच्या इमारतीत प्रवेश सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. दशरथ सगरे व उपाध्यक्ष मा. प्रा. अजिंक्य सगरे यांच्या प्रेरणेतून होत आहे.
प्रवेश मार्गदर्शन कक्ष दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत विद्यार्थ्यांसाठी खुला असणार आहे. विद्यार्थ्यांनी संस्थेच्या www.yes.edu.in या संकेतस्थळावर किंवा थेट कॉलेजमध्ये संपर्क साधावा.
प्रा. अजिंक्य सगरे – उपाध्यक्ष, यशोदा टेक्निकल कॅंपस म्हणाले, “व्यावसायिक अभ्यासक्रमांचे महत्त्व वाढत असताना बीबीए आणि बीसीए साठी घेतलेल्या पहिल्या सीईटीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे दुसऱ्यांदा सीईटी घेण्याचा निर्णय अत्यंत योग्य असून, यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!