सातारा जिल्हा शल्य विशारद संघटनेद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन


मोफत लॅप्रोस्कोपी,गॅस्ट्रोस्कोपी शस्त्रक्रिया आणि रक्तदान शिबिरे

सातारा
दरवर्षी राष्ट्रीय शल्य विशारद संघटना 15 जून हा राष्ट्रीय शल्य विशारद दिवस म्हणून साजरा करत असते या दिवशी देशभरातील सर्व शस्त्रक्रिया तज्ञ हे विविध उपक्रमाद्वारे जनतेपर्यंत जाऊन त्यांना आरोग्य शिक्षित करण्याचे काम करत असतात. सातारा शल्य विशारद संघटनेने यावर्षी शल्य विशारद आठवडा साजरा करण्याचे ठरवले आहे यानिमित्ताने संघटनेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
मोफत आरोग्य शिबिर मोफत लॅप्रोस्कोपी आणि गॅस्ट्रोस्कोपी शस्त्रक्रिया आणि रक्तदान शिबिरे यांचे आयोजन 12 आणि 13 जून रोजी करण्यात आले आहे. सातारचे सिव्हील हॉस्पिटल मध्ये त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला घेण्यात येईल.15 जून रोजी एक दिवसभर सातारा शल्य विशारद संघटनेचे सर्व सभासद एकत्र येऊन अपघात आणि तातडीचे उपचार या विषयावर एक दिवसभराचे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी सातारचे सिविल सर्जन डॉक्टर युवराज करपे हे ह्या अधिवेशनाचे उद्घाटन करणार असून मुंबई पुणे येथील विविध तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामध्ये अपघात शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर सतीश धारप, तसेच डॉक्टर अपर्णा देशपांडे, डॉक्टर मनीष तपासे, डॉक्टर सतीश काबरा, डॉक्टर अमोल भानुषाली, डॉक्टर पराग महाडिक, डॉक्टर विजयकुमार पाटील, डॉक्टर नितीन नांगरे यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

Advertisement

सातारचे ज्येष्ठ शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर अशोक गोंधळेकर यांना लाईफ टाईम अचीव्हमेंट पुरस्कार देण्यात येणार आहे.या अधिवेशनामध्ये सातारा जिल्हा आणि आसपासच्या भागातील सुमारे शंभर शल्य विशारद सहभाग घेणार आहेत अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष आणि कार्यवाह डॉक्टर संतोष जाधव आणि डॉक्टर चैतन्य बोकील यांनी दिली.

सातारा जिल्हा शल्य विशारद संघटनेचा हा अनोखा उपक्रम असून मोफत शिबिरांचा लाभ सर्वसामान्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!