विनोद कुलकर्णी यांचा गुरुवारी सत्कार


आम्ही पुस्तकप्रेमी समूह व दीपलक्ष्मीतर्फे आयोजन
सातारा
99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे व्हावे यासाठी गेली बारा वर्षे संघर्ष करणारे आणि ही मागणी यशस्वीपणे पूर्ण करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा जाहीर सत्कार गुरुवार दिनांक 12 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे करण्यात येणार आहे
आम्ही पुस्तकप्रेमी समूह व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विनोद कुलकर्णी यांचा सत्कार ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कूपर कॉर्पोरेशनचे मुख्य मानव संसाधन अधिकारी नितीन देशपांडे उपस्थित राहणार आहेत
सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन डॉ संदीप श्रोत्री, श्रीराम नानल,शिरीष चिटणीस यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!