शाहूपुरीत पक्क्या रस्त्याअभावी नागरिकांचे हाल
काही वसाहतींमध्ये चिखलाचे साम्राज्य,प्रचंड गैरसोय
सातारा
शाहुपुरी हे सातारा शहराचे वेगाने विकसित होणारे उपनगर मानले जाते पण या उपनगराच्या प्रवेद्वारापाशीच काही वसाहतींमध्ये नागरिकांना अजूनही पक्के रस्ते उपलब्ध नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत पावसात कच्च्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने गैरसोय सहन करावी लागत आहे
पुर्वीच्या जकात नाक्याला लागून वरद विनायक सोसायटी ही 27 वर्ष जुनी कॉलनी आहे.या ठिकाणी काही स्वतंत्र बंगले आहेत आणि काही अपार्टमेंट आहेत .पण मुख्य रस्त्यापासून या वसाहतीत जाणे म्हणजे नागरिकांना संकट वाटत आहे कारण गेल्या अनेक वर्षात या रस्त्याचे काम झाले नाही याच कच्च्या रस्त्यावरून पुढे सार्वजनिक उद्यानात जावे लागते या उद्यानामध्ये खूप वर्दळ असते पण तेथे येणाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो या उद्यानातील पाण्याच्या टाकीचे काम चालू होते तेव्हा मोठ्या आणि जड वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे रस्ते अजून खराब झाले हे काम सध्या बंद असले तरी प्रचंड पावसामुळे या रस्त्यावर केवळ चिखलाचे साम्राज्य आहे त्यामुळे वाहने अडकून पडत आहेत आणि घसरत आहेत ज्येष्ठ नागरिकांना वावरताना कसरत करावी लागत आहे
या भागात तीन नगरसेवक आहेत पण एकाचाही कॉलनीत संपर्क नाही त्यामुळे सतत रस्ते खराब असतात.आजपर्यंत अनेक प्रयत्न करूनही रस्ता आणि लाईट या मूलभूत सेवांपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे.शाहूपुरीच्या मुख्य रस्त्यांचे काम जर झाले असेल तर या रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे अन्यथा नगरपालिकेचा कोणताही कर न भरण्याचा इशारा दिला आहे

