शनिवारी डॉक्टर श्रीनिवास नाटेकर यांच्याशी साहित्यिक गप्पा


आम्ही पुस्तकप्रेमी समूह व दीपलक्ष्मी संस्थेतर्फे आयोजन

Advertisement

सातारा
आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी पतसंस्था सातारा यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 24 मे 2025 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता साहित्यिक गप्पा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये सांगलीमधील सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉक्टर श्रीनिवास नाटेकर हे संवाद साधणार आहेत.
डॉक्टर श्रीनिवास नाटेकर हे निष्णात क्ष किरण तज्ञ आहेतच शिवाय राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन खेळाडू आहेत. त्यांच्या 85 वर्षांच्या समृद्ध आयुष्यात ते क्रीडा चित्रपट नाटक लेखक कवी आणि उद्योगपती यांच्या संपर्कात आले होते. त्यापैकी काही अतिशय लोकप्रिय व्यक्तींच्या अनुभवांवर आधारित त्यांनी त्याचं असं झालं, हे पुस्तक लिहिले. अल्पावधीतच हे पुस्तक खूप लोकप्रिय झाले आणि त्याच्या अनेक आवृत्ती निघाल्या.
शनिवारी 24 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सभागृह येथे डॉक्टर श्रीनिवास नाटेकर हे त्यांच्या या समृद्ध अनुभवांवर सलाईड शो माध्यमातून संवाद साधणार आहेत. त्यावेळी त्यांचा सत्कार कूपर उद्योग समूहाचे मुख्य मानव संसाधन अधिकारी नितीन देशपांडे यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
याप्रसंगी मराठी साहित्य परिषद पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि दैनिक प्रभात चे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांची प्रमुख उपस्थिती आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून याचा फायदा सर्व साहित्य प्रेमी रसिक मंडळी चित्रपट प्रेमी आणि क्रीडाप्रेमी मंडळींनी जरूर घ्यावा असे आवाहन आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे डॉक्टर संदीप श्रोत्री, श्रीराम नानल, मुकुंद फडके आणि दीपलक्ष्मी पतसंस्था अध्यक्ष शिरीष चिटणीस तसेच व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!