साताऱ्यात शनिवारी नगमा ए दर्द हिंदी गीतांचा कार्यक्रम
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि माय बिट्स कराओके स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १७ रोजी सायं ५-३० वाजता दीपलक्ष्मी हॉल येथे नगमा ए दर्द हा दुःख आणि कारुण्य दर्शवणाऱ्या हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात डॉ.लियाकत शेख, ऍड लक्ष्मीकांत अघोर, मुकुंद पांडे, अरुण कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, आशुतोष देशपांडे, ऍड आशुतोष वाळिंबे, प्रिया अघोर, विजया चव्हाण, मधु गिजरे, ऍड रेश्मा वाळिंबे हे कलाकार स्वरसाज चढवणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना ही अरुण कुलकर्णी यांची असून संयोजन आणि निवेदन हे मुकुंद पांडे यांचे आहे. सदर कार्यक्रमास सुरेखा शेजवळ, अनिल वाळिंबे, मुकुंद पांडे, लियाकत शेख आणि विनायक भोसले हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे यांची आहे. सदर कार्यक्रम सर्व सातारकर रसिकांना खुला असून सर्वांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

