अष्टगंधारचा सहावा भाग आज


मोहम्मद अझीझ यांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अष्टगंधार” आठ गायकांची खास मालिका मधील भाग सहावा हा दि. १४ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल मधे आयोजित केला आहे. हा कार्यक्रम दर्द–ए–आवाज अशी ओळख असणारे दिग्गज गायक मोहम्मद अझीझ यांच्या गाण्यांवर आधारित आहे. तसेच रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे विलास जावळे हा कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्याम बडवे, सुनील साबळे, गुलाब सावंत, गीतांजली पाटील तसेच दीपलक्ष्मीचे चेअरमन शिरीष चिटणीस हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे प्रमोद लोंढे यांची आहे व निवेदन सौ राधिका काळे यांचे आहे. विलास जावळे यांचे सोबत रॉयल चे इतर गायक त्यांना साथ संगत देणार आहेत.
तरी ह्या कार्यक्रमास सर्व रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गायक कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन दीपलक्ष्मीचे चेअरमन शिरीष चिटणीस व रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुप तर्फे करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!