लग्न मंडपात तुफान राडा


प्रेमविवाह करणाऱ्या मुलीला कुटुंबियांनी फरफटत नेलं
हैद्राबाद
प्रेमविवाह करणाऱ्या एका तरुणीला चक्क कुटुंबियांनी लग्नमंडपातून फरफटत नेल्याची घटना आंध्र प्रदेशात घडली असून याबाबतचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे हा सर्व धक्कादायक प्रकार आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील कडियामधील घडलाय.चार-पाच तरुण लग्नाच्या मंडपातून नवरीला त्यांच्यासोबत जबरदस्तीने घेचून घेऊन जात आहेत असे या व्हिडिओत दिसत आहे

Advertisement

या घटनेत नवरदेवाच्या कुटुंबियापैंकी तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या तरुणांनी त्यांच्या डोळ्यांवर मिरची पावडर टाकली. तरुणी मदतीसाठी ओरडत होती. मात्र तिला घेऊन जाणाऱ्या तरुणांनी कशाची भीती न बाळगता तिला तेथून घेऊन गेले.या घटनेप्रकरणी नवरदेवाच्या कुटुंबीयांनी त्या तरुणांविरुद्ध अपहरणाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, पशुवैद्यकीय कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एक तरुणीचं आपल्याच कॉलेजमधील एका तरुणावर प्रेम जडलं होतं. दोघांनीही प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला.ठरल्यानुसार, प्रेमी युगुलाने विजयवाडा येथील एका मंदिरात लग्न केले. लग्नानंतर तरुण तिला घेऊन घरी गेला. त्यानंतर तरुणाच्या कुटुंबियांनी दोघांचे औपचारिक पद्धतीने लग्न करण्याचे ठरवले. लग्नात सर्व नातेवाईकांना बोलवण्यात आले. यामध्ये तरुणीच्या कुटुंबियांनाही निमंत्रण देण्यात आलं.मात्र, जेव्हा तरुणीचे कुटुंबिय लग्नमंडपात पोहचले. तेव्हा त्यांनी संताप व्यक्त केला. कशाचा विचार न करता तरुणीच्या कुटुंबियांनी लग्न मंडपात गोंधळ घातला. या घटनेत नवरदेवाच्या कुटुंबियातील एक सदस्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!