ज्ञानविकास मंडळाची वसंत व्याख्यानमाला रविवारपासून
12 दिवस रसिकांना विविध कार्यक्रमांची मेजवानी
सातारा
ज्ञानविकास मंडळ सातारातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या वसंत व्याख्यानमालेचे 52 वे सत्र रविवार दिनांक 12 मे पासून सुरू होणार असून त्याची सांगता 22 मे रोजी होणार आहे
या बारा दिवसांच्या कालावधीमध्ये रसिक श्रोत्यांना विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. कै श्रीराम अनंत सहस्त्रबुद्धे आणि कै सौ राजश्री श्रीराम सहस्त्रबुद्धे मुंबई यांच्या स्मरणार्थ ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे
रविवार दिनांक 11 मे रोजी डॉक्टर आदिती काळमेख वैदेही कुलकर्णी साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांच्या कथांचे अभिवाचन करणार आहेत
सोमवार दिनांक 12 मे रोजी बदलत्या जीवनशैलीत आयुर्वेदाचे महत्त्व यावर डॉक्टर आनंद ओक आपले विचार व्यक्त करतील
मंगळवार दिनांक 13 मे रोजी फाळणी कारण प्रक्रिया आणि परिणाम या विषयावर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे व्याख्यान सादर करतील
बुधवार दिनांक 14 मे रोजी बस झाले आता फोडाफोडीचे राजकारण या विषयावर परिसंवाद होणार असून त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके, श्रीकांत कात्रे, जयंत लंगडे ,मधुसूदन पत्की आणि गोविंद बेडकिहाळ हे सहभाग घेणार आहेत
गुरुवार दिनांक 15 मे रोजी संगीत रंगभूमीचा इतिहास या विषयावर डॉक्टर सौ अर्चना साने यांचे व्याख्यान होणार आहे
16 मे रोजी सुषमा फडके यांचा कथाकथन कार्यक्रम होणार आहे
17 मे रोजी अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे ही मुलाखत न्यु इंग्लिश स्कुल येथे होणार आहे
18 मे रोजी साताऱ्यातील गायक कलाकार राजेंद्र पाटील अजय घोरपडे रमिजा सय्यद गीता उधानी आणि विनय कुलकर्णी साज और आवाज हा जुन्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत
सोमवार दिनांक 19 मे रोजी या बेरोजगारीच करायचे काय या विषयावर जेष्ठ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर यांचे व्याख्यान होणार आहे
मंगळवार दिनांक 20 मे रोजी कविता गाते गाणे या विषयावर गीतकार संगीतकार व अभिनेते कविकिरण पाटील कार्यक्रम सादर करतील
बुधवार दिनांक 21 मे रोजी स्वराज्य पुरस्कर्ते लोकमान्य या विषयावर ज्ञा विकास मंडळाचे कार्याध्यक्ष प्रसाद चाफेकर यांचे व्याख्यान होणार आहे
गुरुवार दिनांक 22 मे रोजी महायुती सरकार आश्वासनांची खैरात या विषयावर विधान परिषद सदस्य ऍड अनिल परब यांचे व्याख्यान होणार आहे
प्रतीक्षा लोणकर यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रम सोडता सर्व व्याख्याने सातारा नगर वाचनालयाच्या पाठक हॉल येथे दररोज संध्याकाळी सव्वा सहा वाजता होणार आहेत
या व्याख्यानमाेचा लाभ सातारकर यांनी घ्यावा असे आवाहन प्रसाद चाफेकर यांनी केले आहे

