राज्यसभेत सापडले नोटांचे बंडल


सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी
नवी दिल्ली
मुंबई
विरोधी पक्षाच्या खासदाराच्या सीटवर नोटांचे बंडल सापडले आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी या विषयाची माहिती सभागृहाला दिली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे या मुद्द्यावर बोलण्यासाठी उभे राहिले असता सत्ताधारी पक्षातील लोकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सत्ताधाऱ्यांनी गोंधळ करण्यास सुरूवात करताच मल्लिकार्जुन खर्गे हे चांगलेच संतापल्याचे बघायला मिळाले. त्यांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले.
सभापती जगदीप धनखड म्हणाले की, मला अशी माहिती मिळाली आहे की, काल सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर चलनातील नोटांचे बंडल मिळाले आहे. त्यांनी सांगितले की, बाक नंबर 222 वर हे नोटांचे बंडल भेटले आहे. हा बाक नंबर काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आला आहे. अभिषेक मनू सिंघवी हे 2024-26 साठी तेलंगणातून राज्यसभेचे खासदार आहेत.
या मुद्द्यावर बोलण्यासाठी खर्गे उठले असता सभापती जगदीप धनखड यांनी म्हटले की, फक्त नोटांच्या मुद्दयावरच बोला. त्यावर खर्गे म्हणाले की, मला अगोदरच माहिती आहे मी जर दुसऱ्या कोणत्या मुद्दावर बोललो तर तुम्ही मला बोलूच देणार नाहीत. माझी विनंती आहे की, जोपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे, तोपर्यंत ज्याच्या जागेवर हे नोटांचे बंडल सापडले त्या व्यक्तीचे नाव सांगू नये.
खर्गे यांचे हे बोलणे ऐकताच सत्ताधारी गदारोळ करताना दिसले. सत्ताधाऱ्यांचा गदारोळ पाहून खर्गे संतापले आणि म्हणाले की, असे करून तुम्ही देशाची बदनामी करत आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा याबद्दल बोलताना म्हणाले की, तुम्ही एखाद्यावर तीव्रता दाखवता आणि एखाद्या मुद्द्यावर चिखलफेक करता, हे योग्य नाही. राज्यसभेत यावरून मोठा गोंधळ झाला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!