पुरस्कारांसाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन


अश्वमेधचा राज्यस्तरीय “अक्षर गौरव साहित्य पुरस्कार

Advertisement

सातारा
अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय यांच्यातर्फे उत्कृष्ट साहित्यकृतींना राज्यस्तरीय कै. भास्करराव ग. माने स्मृत्यर्थ राज्यस्तरीय ‘अक्षरगौरव पुरस्कार’ देण्यात येतो. पुरस्कारांचे हे १४ वे वर्ष आहे. या वर्षी जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या वर्षातील प्रकाशित दोन उत्कृष्ट साहित्यकृतींना राज्यस्तरीय ‘अक्षर गौरव साहित्य पुरस्कार २०२४’ हा पुरस्कार देण्यात येणार असून, या पुरस्काराचे स्वरूप २५००/- रोख, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. सातारा जिल्हातील दोन लेखकांना “अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार २०२४” तर आरोग्य विषयक ग्रंथासाठी डॉ. श्रीकांत कारखानीस स्मृत्यर्थ देखील पुरस्कार देण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरूप १०००/- रोख स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. साहित्य क्षेत्रातील जाणकार निवड समितीकडून या साहित्यकृतींची निवड केली जाईल. तरी या पुरस्कारासाठी लेखक व प्रकाशकांनी आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय, सातारा व्यंकटेशविश्व अपार्टमेंट ३८०/अ,सोमवार पेठ, न्यू इंग्लिश स्कूल चौकाजवळ,सातारा मोबाईल नंबर -७५१७४११९९९ या पत्त्यावर ३० जून, २०२५ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन ग्रंथालयाचे संस्थापक, माजी सभापती रविंद्र भारती- झुटिंग व अध्यक्ष साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी केले आहे.
या पुरस्काराबाबतचे सर्व अधिकार निवड समितीला राहतील. या पुरस्कारांच्या वितरणाची तारीख नंतर कळविली जाईल. या पुरस्कारासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश घेता येईल. तसेच या पुरस्काराचे वितरण साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती ग्रंथालयाचे कार्यवाह शशिभूषण जाधव यांनी दिली. अधिक माहितीसाठी साहित्यिक डॉ. राजेंद्र माने (9422600035) यांच्याशी संपर्क साधावा.
एकदा अक्षरगौरव पुरस्कार प्राप्त झाला की तीन वर्ष त्या लेखकाचे कलाकृतीचा या पुरस्कारासाठी विचार होत नाही अशी माहिती देण्यात आली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!