कुमार भुरके यांचे निधन
सिद्धहस्त रंगभूषाकार काळाच्या पडद्याआड
Advertisement
साताराः
येथील सिद्धहस्त रंगभूषाकार, अभिनेते आणि प्रसिद्ध व्यापारी कमलनयन ऊर्फ कुमार मधुसूदन भुरके (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.
सातारच्या सांस्कृतिक वर्तुळात हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून भुरके परिचित होते. राजपथावरील ललना एक्सेलन्स हा व्यवसाय त्यांनी मोठ्या कष्टाने नावारूपाला आणला. त्यांच्या अंत्ययात्रेत उद्योग, व्यापार क्षेत्रातील मान्यवर आणि रंगकर्मी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

