भाजप उमेदवाराचा मृत्यू


मतमोजणीनंतरच होणार आता पुढील निर्णय
नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाचे मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी दिल्ली एम्समध्ये सायंकाळी साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुंवर सर्वेश यांना भाजपकडून तिकीट मिळाले, तेव्हापासून ते रुग्णालयात दाखल होते. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी उमेदवाराचा मृत्यू झाल्याने आता निवडणुक पुन्हा होणार कायाबाबतची चर्चा सुरू आहे.
सर्वेश सिंह यांच्या निधनाची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळातून सर्वसामान्यांपर्यंत एक प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे. वास्तविक कुंवर सर्वेश सिंह हे भाजपचे उमेदवार होते. मुरादाबाद जागेवरही निवडणूक पूर्ण झाली आहे. अशा स्थितीत मुरादाबादच्या जागेवर फेरनिवडणूक होणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुरादाबाद जागेवरील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशा स्थितीत पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही. मतमोजणीच्या दिवशी सर्वेश सिंह विजयी झाल्यास किंवा सर्वेश सिंह यांचा पराभव होऊन अन्य कोणी उमेदवार विजयी झाल्यास तेच खासदार होतील, हे निश्चित आहे.त्यावेळी पोटनिवडणुकीची गरज भासणार नाही. मात्र जर सर्वेश सिंह विजयी घोषित झाले, तेव्हा ते त्यांच्या लोकसभा मतदारसंघासाठी उपस्थित राहणार नाहीत, त्यामुळे ही निवडणूक रद्द होईल आणि पुन्हा निवडणूक होईल


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!