इशरे सातारा सब चॅप्टरचा सोमवारी पदग्रहण समारंभ


अध्यक्षपदी उदय कुलकर्णी,उपाध्यक्षपदी दिलीप किरपेकर

सातारा
इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग इंजिनियरिंग अर्थात इशरे या संस्थेच्या सातारा सब चॅप्टरचा पदग्रहण आणि शपथग्रहण सोहळा सोमवार दिनांक २८ एप्रिल रोजी होणार आहे केबीपी कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग येथे सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे
इशरे सातारा सब चॅप्टर हा इशरे कोल्हापूरच्या अंतर्गत सुरु होत आहे.सातारा सब चॅप्टरचे अध्यक्ष म्हणून कंबाईन एजन्सीजचे उदय कुलकर्णी,उपाध्यक्षपदी
ईशान एंटरप्राइझेसचे दिलीप किरपेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे सचिवपदी यशवंत रेफ्रीजरेशनचे सुनिल टिळेकर, खजानीस म्हणून हणमंत पाटील, तसेच संचालक म्हणून कूल व्हीजनचे मिलींद पाठक,आर.एस.रेफ्रीजरेशनचे राजू केशव शेंडे,अजिंक्य सेल्स ऍंड सर्व्हिसेसचे समीर पवार,केबीपी कॉलेज ऑफ इंजिनीयरिंगचे प्रा.प्रविण जाधव ,प्रा.धनंजय देवी काम पाहणार आहेत

Advertisement


कोल्हापूर चॅप्टरचे माजी अध्यक्ष .प्रमोद पुंगावकर, अध्यक्ष अवेस अहमद हुसैनी, मुंबई चॅप्टरचे अध्यक्ष जयंत पाटेकर व कोल्हापूर चॅप्टरचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या सर्वांचा शपथग्रहण समारोह होणार आहे
शपथग्रहण कार्यक्रमानंतर जयंत पाटेकर यांचे व्याख्यान होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!