मुंबईत विमानांची धडक टळली


धावपट्टीवर  एकाचवेळी दोन विमाने
मुंबई :
विमानतळावर एकाच रनवेवर दिवसभरात कितीतरी विमानं लँड होतात आणि टेक ऑफ करतात. टेक ऑफ करण्याआधी आणि लँड झाल्यानंतरही विमान धावपट्टीवर धावतं. अशावेळी जर एकाच वेळी दोन विमानं एकत्र धावपट्टीवर आली तर विवहित्र स्थिती निर्माण होते हे प्रत्यक्षात घडलं ते मुंबईत. एक विमान लँड होत असताना दुसरं विमान टेक ऑफ होत होतं. एकाच रनवेवर दोन विमानं एकत्र आली
मुंबई विमानतळावरील विमानांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आधीपासून एक विमान विमानतळावर टेक ऑफ करण्याच्या तयारी होतं, त्या विमानानं उड्डाण केलं नव्हतं ते धावपट्टीवर होतं तोच दुसऱ्या विमानाचं लँडिंग झालं. हे दृश्य कॅमेऱ्यात झालं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.शनिवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचं सांगितलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून एअर इंडियाचं विमान टेक ऑफ करत असताना इंडिगोचं विमान लँड झालं.एव्हिएशन न्यूज वेबसाइट आउटलेट सिम्पल फ्लाइंगने दिलेल्या माहितीनुसार देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावरून (आयडीआर) टेक ऑफ केल्यानंतर इंडिगो फ्लाइट 5053 रनवे 27 वर लँडिंग करत होती, तर एअर इंडियाचे फ्लाइट 657 तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे (TRV) जाण्यासाठी उड्डाण करत होतं.
दोन्ही विमानं एकमेकांच्या खूपच जवळ होती. व्हिडीओत पाहू शकतात दोन्ही विमानांमध्ये खूपच कमी अंतर आहे. एक विमान लँड होताच ते रनवेवर पुढे येईपर्यंत दुसऱ्या विमानानं टेक ऑफ केलं. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही.पण मागून दुसरे विमान त्याच्या दिशेने येत आहे हे कदाचित त्याच्या पायलटला माहीत नव्हतं, असं सिम्पल फ्लाइंगच्या वृत्ता म्हटलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!