सातारा जिल्ह्याचे माझ्या जडण घडणीत मोठे योगदान
सत्कार समारंभात प्रा मिलींद जोशी यांचे प्रतिपादन
सातारा
सातारा जिल्ह्याचे माझ्या जडण घडणीत मोठे योगदान आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षप्रा मिलींद जोशी यांनी केले
श्री छ प्रतापसिंह महाराज ( थो ) नगरवाचनालय सातारा तर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपदी प्रा. मिलींद जोशी, कार्यवाहपदी सौ सुनिताराजे पवार व कोषाध्यक्षपदी श्री विनोद कुलकर्णी यांची निवड झालेबद्दल शाल , पेढ्यांचा हार , आंब्याचा बॉक्स देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी विचारमंचावर नगर वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री अजित कुबेर व विश्वस्त समितीचे अध्यक्ष अनंत जोशी , लेखक डॉ राजेंद्र माने ,कार्यवाह सौ वैदेही कुलकर्णी उपस्थित होते.यावेळी मसाप पुणे कार्यवाह कवी राजन लाखे व लेखक दिनेश फडतरे यांचाही गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला .
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा मिलिंद जोशी म्हणाले, ज्या वाचनालयात माझे गुरु प्राचार्य शिवाजीराव भोसले यायचे व ग्रंथवाचन करायचे त्याच ग्रंथालयाने माझा केलेला सत्कार माझे द्दष्टीने महत्वाचा आहे . माझ्या जडणघडणीची महत्वाची वर्षे सातारा जिल्हयात गेली त्या अर्थाने मी ही सातारा जिल्ह्यातील आहे. या जिल्ह्याचे माझ्या जडणघडणीत मोठे योगदान आहे . नगरवाचनालयात व्याख्यानाचे निमित्ताने मी खूप वेळा आलो .या वाचनालयाशी माझे वेगळे ऋणानुबंध आहेत. माझ्या आई वडिलांचे माझ्या सर्व आयुष्यात खूप मार्गदर्शन लाभले .त्याचबरोबर वेळेवर जर प्राचार्य शिवाजीराव भोसले भेटले नसते तर
कदाचित मी लेखक झालो नसतो व असे महामंडळाचे अध्यक्षपद सुद्धा लाभले नसते . इतक्या जुन्या वाचनालयाने केलेला हा सत्कार पुढील कार्याला प्रेरणा
देणारा ठरेल .
या वेळी विनोद कुलकर्णी म्हणाले, साहित्य संस्थाशी माझा संबंध आला आणि त्यातून मी घडत गेलो . मिलींद जोशी यांचे मार्गदर्शनामधून पुण्याबाहेरचा असूनही मसापचा कोषाध्यक्ष आणि आता महामंडळाचा कोषाध्यक्ष म्हणूनही काम करता येणार आहे . नगरवाचनालयाचा संचालक असलेने हा सत्कार माझ्या दृष्टीने जवळचा सत्कार आहे. पुढील साहित्य कारकिर्दीसाठी प्रेरणा देणारा आहे .
सौ सुनिताराजे पवार म्हणाल्या ‘ सातारा जिल्ह्यातल्या या नगरवाचनालयात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे निमित्ताने खूपदा येण्याचा योग आला. या वाचनालयाने यापूर्वीही कर्तृत्वगौरव पुरस्कार देऊन माझा गौरव केला आहे . शेतकरी कुटुंबातून येवून लेखिका, संपादिका, प्रकाशिका ते मसापची पहिली महिला कोषाध्यक्षा व आता महामंडळाची कार्यवाह हा प्रवास संघर्षमय होता . परंतु सगळ्यांचे सहकार्य लाभले त्यामुळे हे सगळे शक्य झाले ., वाचनालयाकडून झालेला हा सत्कार एका दृष्टीने घरचा सत्कार आहे .
यावेळी लेखक डॉक्टर माने यांनी प्रास्ताविकात आजच्या तिन्ही सत्कारमूर्ती नगरवाचनालयाशी फार वर्षापासून जोडल्या गेल्या आहेत . या पदापर्यंत पोहोचणेसाठी तिघांनीही वेगळा संघर्ष केला आहे . एकशे सत्तरवर्षापेक्षा जास्त जुन्या वाचनालयाकडून झालेला हा सत्कार म्हणजे ग्रंथ देव्हाऱ्यातला सत्कार आहे .
यावेळी अनंत जोशी यांनीही मनोगतात हा सत्कार स्वीकारलेबद्दल तिघांना धन्यवाद दिले व ९९ वे साहित्य संमेलन साताऱ्यात व्हावे अशी इच्छा व्यक्त केली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही कुलकर्णी यांनी केले.आभार प्रदीप कांबळे यांनी मानले .
यावेळी कार्यवाह श्री प्रकाश शिंदे , डॉ श्याम बडवे , बानुबी बागवान , प्राचार्य रमणलाल शहा , पत्रकार अनील वीर , कांता भोसले , मनीषा शिरटावले , सीमा नूलकर , लता चव्हाण , आनंदा ननावरे ,गौतम भोसले , डॉ मोहन सुखटणकर ,नंदकुमार सावंत , ॲड चंद्रकांत बेबले , राजेश जोशी , वजीर नदाफ , रागिणी जोशी , कविता प्रभुणे , सुषमा भिडे वगैरे मान्यवर उपस्थित होते
फोटो
प्रा मिलींद जोशी यांचा सत्कार करताना अनंत जोशी शेजारी डॉ राजेंद्र माने , पवार, विनोद कुलकर्णी, अजीत कुबेर, वैदेही कुलकर्णी

