प्रकाशरेषा पुस्तकावर गुरुवारी चर्चासत्र


श्रीकांत कात्रे,ज्योत्स्ना कोल्हटकर यांचा होणार सन्मान
सातारा –
येथील दीपलक्ष्मी सहकारी पतसंस्था आणि आम्ही पुस्तकप्रेमी ग्रुप यांच्या पुढाकारातून गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी पत्रकार श्रीकांत कात्रे यांच्या प्रकाशरेषा पुस्तकावर चर्चासत्र तसेच त्यांचा एकसष्टीनिमित्त सत्कार आयोजित करण्यात आला आहे .यावेळी श्री. छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय, साताराच्या ज्येष्ठ संचालक डॉ.ज्योत्स्ना कोल्हटकर यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कोषाध्यक्ष आणि सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी,मराठी पत्रकार संघ सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आणि पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे,ज्येष्ठ पत्रकार व लेखक मुकुंद फडके आणि दैनिक सकाळचे सहयोगी संपादक राजेश सोळसकर हे प्रकाशरेषा पुस्तकावर चर्चा करणार आहेत.
श्रीकांत कात्रे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले असून या पुस्तकात रेखाटलेल्या विविध व्यक्तीरेखांची चर्चा या चर्चासत्राच्या निमित्ताने केली जाणार आहे.सातारकर नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, श्रीराम नानल आणि विनायक भोसले यांनी केले आहे.
याच ठिकाणी श्रीकांत कात्रे यांचे प्रकाशरेषा हे पुस्तक सवलतीच्या दरात २००/-रुपये आणि विनोद कुलकर्णी यांचे मोठ्या बँकेची छोटी गोष्ट हे पुस्तक सवलतीच्या दरात १५०/- रुपये किमतीत उपलब्ध असेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!