बुधवारी डॉक्टर सुलभा ब्रम्हनाळकर यांच्याशी संवाद
आम्ही पुस्तकप्रेमी समूह व दीपलक्ष्मी यांचा लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रम
सातारा
आम्ही पुस्तकप्रेमी समूह व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा यांच्यावतीने लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमात यावेळी प्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि गोफ जन्मांतरीचे, डॉक्टर म्हणून जगताना / जगवताना ,बंद खिडकीबाहेर इत्यादि पुस्तकांच्या लेखिका डॉक्टर सुलभा ब्रम्हनाळकर यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे
बुधवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी हॉलमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार असून डॉक्टर मेधा क्षीरसागर, डॉक्टर स्वाती श्रोत्री आणि गौरी वैद्य डॉक्टर सुलभा ब्रम्हनाळकर यांच्याशी संवाद साधणार आहेत
या कार्यक्रमाच्या समन्वयक स्वाती राऊत आहेत
. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही पुस्तकप्रेमी समूह व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यातर्फे करण्यात आले आहे

