पेशंट आणि डॉक्टर यांच्यातला विश्वास महत्वाचा
साताऱ्यात आयोजित परिचर्चेत मान्यवरांचे मत
सातारा
आधुनिक काळात पेशंट आणि डॉक्टर यांच्यातला विश्वास महत्वाचा असून रुग्णांच्या समुपदेशनासाठी विशेष व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे मत
साताऱ्यात आयोजित परिचर्चेत विविध मान्यवरांनी व्यक्त केले
अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय आणि भारती फाउंडेशन यांच्या वतीने ‘सद्यस्थितीतील डॉक्टर व पेशंट यांच्यातील नातेबंध ‘या विषयावर या परिचर्चेचे आयोजन केले होते.
यामध्ये डॉक्टर दिलीप पटवर्धन, डॉ राजेंद्र माने, डॉक्टर संदीप श्रोत्री, डॉक्टर संजीवनी यादव, डॉक्टर अशपाक मुल्ला या डॉक्टरांनी सहभाग घेतला होता.
प्राध्यापक श्रीधर साळुंखे यांनी यांच्याशी संवाद साधला. यावेळी विचारमंचावर डॉ रविंद्र भारती उपस्थित होते.
फॅमिली डॉक्टर ही संकल्पना फार पूर्वीपासून रुढ आहे पण काळाच्या ओघात या संकल्पनेला थोडी ओहोटी लागली आहे .पण तरीसुद्धा अजूनही लोकांची श्रद्धा शाबित असल्यामुळे दोन तीन पिढ्या चे पेशंट एका डॉक्टरकडे जात असतात . फॅमिली डॉक्टरला त्या कुटुंबातील अनुवंशीक व्याधी, आर्थिक परिस्थिती व मानसिकता माहिती असते त्याचा फायदा रुग्णाना होतो,असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले
पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये असलेला विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. हॉस्पिटल मध्ये येणारे जादा चार्जेस हे तेथील अत्याधुनिक उपकरणे आणि उपचार याच्याशी संबंधित असतात पण अत्यावश्यक पेशंटला मुद्दाम अडवणे आणि तेही पैशासाठी असे शक्यतो होत नाही आणि होऊ नये. पण तरीही डॉक्टर हा देव नसतो आणि कुठलाच डॉक्टर पेशंटला अपाय होईल म्हणून ट्रीटमेंट करत नसतो, फक्त काही वेळा योग्य समन्वय न झाल्यामुळे गैरसमज निर्माण होतात आणि त्यातून वाद उद्भवतात. पण डॉक्टरांवर हल्ला किंवा हॉस्पिटलची मोडतोड हा अशा प्रश्नावरचा उपाय नसतो. सरकारी हॉस्पिटल सुद्धा अत्यंत चांगले उपचार देत असते. पण काही वेळा तेथील डॉक्टरांची कमतरता यामुळे लोकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा होत असतो. पण सध्या सुद्धा सरकारी दवाखान्यांमध्ये जास्तीत जास्त चांगले उपचार करण्याचे प्रयत्न होत असतात ,असेही सांगण्यात आले
ग्राहक संरक्षण कायदा आल्यापासून वैद्यकीय सेवा ही सेवा पेक्षा धंदा बनली आहे असे काहींचे मत पडले पण पेशंटचा डॉक्टरांच्या वरचा असणारा विश्वास हा यातही जास्त महत्त्वाचा आहे. कदाचित एखाद दुसऱ्या ठिकाणी काही घटना घडत असतील पण तरीसुद्धा समाजात डॉक्टर हा घटक समाज जीवन चांगले राहावे आणि माणसाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी महत्त्वाचा आहे.डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातला नातेबंध सजग राहण्यासाठी दोन्ही बाजूकडून तितके चांगले प्रयत्न घडणे महत्त्वाचे आहे. विश्वास दोन्ही बाजूकडून पाहिजे. या नात्यातली माणुसकी कायम जिवंत राहील असा प्रयत्न दोघांनी करायला पाहिजे.अशा आशयाची मते मान्यवर डॉक्टरांनी व्यक्त केली.
हॉस्पिटलमधून पेशंटच्या आर्थिक परिस्थितीचा विचार व्हायला पाहिजे आणि बीलाची कल्पना आधी पेशंटना द्यायला पाहिजे. त्याचे व्यावसायिकरण होवू नये. औषधी कंपन्याचे औषधदरावर नियंत्रण पाहिजे,रुग्णांच्या समुपदेशनासाठी विशेष व्यवस्था निर्माण करायला हवी मत मुक्त चर्चेत व्यक्त झाले.
अश्वमेध ग्रंथालय आणि भारती फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर रवींद्र भारती यांनी प्रास्ताविकात त्या परीचर्चे मागची भूमिका व्यक्त केली यावेळी डॉक्टरांचे सत्कार अश्वमेधचे कार्यवाह शशिभूषण जाधव, उपाध्यक्ष डी एम मोहिते, विश्वस्त आनंद ननावरे, गौतम भोसले यांचे हस्ते करण्यात आले.
या मुक्त चर्चे वेळी पत्रकार मुकुंद फडके, बाबुराव शिंदे, डॉ शाम बडवे, हेमंत कासार, आशाताई कुंदप, गौरी हेंद्रे, रवींद्र शिवदे, डॉ मोहन सुखटणकर, संजय तवले, केदार खैर, मदन देशपांडे, श्रीमती काटेकर, निलेश पवार मान्यवर उपस्थित होते
फोटो ओळ
डॉ दिलीप पटवर्धन यांचा सत्कार करताना प्रा. श्रीधर साळुंखे, डॉ राजेंद्र माने, रविंद्र भारती, डॉ संदीप श्रोत्री, डॉ संजीवनी यादव, डॉ अश्पाक मुल्ला

