सोमवारी मोतीबाग कार्यालयामध्ये रक्तदान शिबिर


भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम
पुणे
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त भारतीय संस्कृती संवर्धक संस्था व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोतीबाग नगर,कसबा भाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १४ एप्रिल रोजी संस्थेच्या शनिवार पेठ येथील मोतीबाग कार्यालयामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
१४ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर आयोजनाचे यंदाचे हे ९ वे वर्ष असून जनकल्याण रक्तपेढी यांचे सहकार्य लाभणार आहे.
१४ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत हे रक्तदान शिबिर होणार असून या शिबिराचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता “ज्ञानदीप अकॅडमी” चे संचालक महेश शिंदे ह्यांचे हस्ते होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा भागाचे कार्यवाह राहुल पुंडे यांची मुख्य उपस्थिती असणार आहे.
तरी जास्तीत जास्त जणांनी या शिबिरामध्ये रक्तदान करावे असे आवाहन रक्तदान शिबिर संयोजक सागर दरेकर व भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी,कार्यवाह प्रसाद खेडकर यांनी केले आहे.
रक्तदात्यांनी अधिक माहितीसाठी व नांव नोंदणीसाठी मयंक ९०९६७२५२६२ किंवा सागर ७०२८१४२३८८ यांचेशी संपर्क करावा.
सागर दरेकर
9657472626
रक्तदान शिबिर संयोजक.
प्रसाद खेडकर
9226433647
कार्यवाह
भारतीय संस्कृती संवर्धक संस्था
मोतीबाग,पुणे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!