स्किल बेसङ एज्युकेशन विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक – श्रीरंग काटेकर .


अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व स्कवेअर वेवचा स्तुतय उपक्रम, कौशल्य विकासास प्राधान्य, विराज शिंदे बेस्ट स्टुंडटने सन्मानित.
सातारा – जागतिक उद्योग विश्वातील बदलती समीकरणे पाहता या पुढील काळात स्किल बेसङ एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते सातारा येथील गजानन मंगल कार्यालय येथे अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पानमळेवाडी व स्कवेअर वेव ऑटोमेशन टेक्नालाॅजी प्रा.लि. यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या कौशल्ये विकसित मनुष्यबळ निर्मिती अभियान अंतर्गत कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. विलास फरांदे, कॅम्पस डीन सुहास पाटील, प्रा. भाग्यश्री पोळ, प्रा. सोमेश नाईक तसेच स्कवेअर वेवचे संचालक तुषार इनामदार संचालिका हर्षदा इनामदार अदि प्रमुख उपस्थित होते.
श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात संपूर्ण उद्योग विश्वातील प्रत्येक क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे या स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी विविध कौशल्ये व विकासाचे तंत्र आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाही काळाची गरज ओळखून स्कवेअर वेवचे संचालक तुषार इनामदार यांनी प्रगत तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण शिक्षणाची सुविधा सातार्‍यात सुरू केली आहे याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे.
अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे प्राचार्य डॉ. विलास फरांदे म्हणाले की इंडस्ट्रील आवश्यक असणारे कैशल्ये विकसीत मनुष्यबळाची गरज पाहाता इंडस्ट्रिल  इन्स्टिट्यूट इंटअॅक्शनची खरी ओळख विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे त्यासाठी अचूक मार्गदर्शनाची गरज आहे. विद्यार्थी कौशल्ये विकासाने घडवण्यासाठी आम्ही विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतो गुणात्मक वाढीबरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजचे महत्व अधिक आहे याची जाणीव आता विद्यार्थ्यांना होऊ लागली आहे.
स्कवेअर वेवचे संचालक तुषार इनामदार म्हणाले की उद्योग विश्वाला आवश्यक असणारा मनुष्यबळ निर्मितीचा ध्यास घेवून  स्कवेअर वेव विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देवून घडवित आहेत. आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रॅक्टिकल नॉलेज प्राप्तीसाठी साताऱ्यात सुसज्ज लॅबची निर्मिती केली आहे इंडस्ट्रीज मधील नोकरीसाठी पूरक ठरणारे ज्ञान कौशल्याने परिपूर्ण विद्यार्थी घडवणे हेच प्रमुख उद्दिष्ट ठेवून आम्ही वाटचाल करीत आहोत.
प्रारंभी स्कवेअर वेव च्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांचा उचित सत्कार गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये बेस्ट स्टुडटचा बहुमान विराज शिंदे यांनी मिळविला तर अजिंक्य सफई, अलमास शेख, गायत्री देसाई, श्वेता पवार, दिव्या कुंभार, पूर्वी शेळके, सायली पवार यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा ही स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका जाधव हिने केले व आभार संचालिका हर्षदा इनामदार यांनी केले.
चौकट – स्कवेअरच्या सुसज्य लॅब मुळे विद्यार्थ्यांना आता हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही साताऱ्यात कौशल्य विकासाची आधुनिक शिक्षण सहज उपलब्ध झाल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही नवसंजवनी ठरली आहे प्रगत तंत्रज्ञान व उच्चशिक्षण विशेषता रोबोट, ड्राईव्ह,  हुमन मशिन इंटरफेस,आय ओ टी कंट्रोल,पी. एल.सी ङीझाईन,न्युमॅटीक्स,स्कङा ऑटोमेशन सारखे नाविन्यपूर्ण ज्ञान कौशल्य येथे सहज उपलब्ध आहेत याचा लाभ विद्यार्थ्यांना होत आहे.
फोटो – बेस्ट स्टुडंट अवार्डने विराज शिंदे यांना सन्मानित करताना श्रीरंग काटेकर समवेत डॉ विलास फरांदे, प्रा. सुहास पाटील, प्रा.तुषार शेंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!